मी आजही सत्तेत नाही अन् भविष्यातही नसेन, मला केवळ सेवा करायची आहे ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मला सत्तेत जाण्याचा आशीर्वाद देऊ नका. मी गरिबांच्या सेवेसाठी आहे. मी आजही सत्तेत नाही आणि भविष्यातही मला सत्तेत जायचे नाही. मला केवळ सेवेत रहायचे आहे.

समर्पित भावनेने हिंदुत्वाचे कार्य करणारे मुंबईतील कर्मयोगी आनंदशंकर पंड्या यांना हिंदुत्वनिष्ठ आणि मान्यवर यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली !

एका व्यक्तीने संकल्प केला, तर ती काय करू शकते ? याचे आनंदशंकर पंड्या हे उत्तम उदाहरण ! शेवटच्या श्वासापर्यंत हिंदूंना जागृत ठेवण्यासाठी झटणारे हे व्यक्तीमत्व होते !

शेतकरी हित कि अहित ?

‘जनतेला काय आवडते ? यापेक्षा जनतेच्या जे हिताचे आहे’, त्यानुसार निर्णय घेण्यात शासनकर्त्यांची खरी कसोटी आहे. जे योग्य आहे, त्याला शेवटपर्यंत धरून रहाणे आणि ज्यांना समजत नाही, त्यांना समजावून सांगणे हे कौशल्यच आहे.

आवश्यकता भासल्यास पुन्हा कृषी कायदे बनवले जातील ! – राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र

केंद्र सरकारने ३ कृषी कायदे रहित करण्याची केलेली घोषणा, म्हणजे सकारात्मक दिशेने टाकलेले एक पाऊल आहे; पण सध्याची परिस्थिती अनुकूल नाही.

(म्हणे) ‘महाराष्ट्र, बंगाल आणि केरळ सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न !’ – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

‘शेती हा देहलीचा नव्हे, तर राज्याचा विषय आहे. आम्ही कृषी विद्यापिठांना विचारून निर्णय घेत होतो’, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

चीनने भारताचा भूभाग बळकावला, हेही पंतप्रधान मोदी आता स्वीकारणार का ? – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांचा प्रश्‍न

भारत आणि चीन सीमा प्रश्‍नावरून गेल्या अनेक दिवसांपासून डॉ. स्वामी केंद्र सरकारवर टीका करत आहेत. ‘नियंत्रण रेषेवरून भारत मागे फिरला, चीन नाही’, असा दावाही त्यांनी यापूर्वी केला होता.

संसदेत कायदे रहित होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार ! – शेतकरी नेते राकेश टिकैत

तीन कृषी कायद्यांच्या विरोधातील हे आंदोलन तात्काळ मागे घेतले जाणार नाही. आम्ही त्या दिवसाची वाट पाहू, जेव्हा कृषी कायदे संसदेत रहित केले जातील ! कायदे मागे घेणे, हा या आंदोलनात सहभागी झालेले आदिवासी, श्रमिक आणि महिला यांचा विजय आहे.

केंद्र सरकारकडून ३ कृषी कायदे रहित ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

मला कुणालाही दोष द्यायचा नाही. कदाचित् आमच्या तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असेल. त्यामुळेच आम्ही त्या शेतकर्‍यांची समजूत घालण्यात न्यून पडलो, असे मला वाटते. त्यामुळेच हे ३ कृषी कायदे रहित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी प्रसंगावधानता दाखवत प्रवाशाचे प्राण वाचवले !

इंडिगो एअरलाइन्सने डॉ. कराड हे रुग्णाला साहाय्य करत असतांनाचे छायाचित्र ट्वीट करत ‘डॉ. कराड यांनी प्रवाशाला साहाय्य करण्यासाठी स्वत:हून दाखवलेली सिद्धता ही प्रेरणादायी आहे’, असे म्हटले आहे.

हबीबगंज (भोपाळ) येथील रेल्वे स्थानकाला ‘राणी कमलापती’ यांचे नाव देेणार

येथील हबीबगंज रेल्वे स्थानक नव्या रूपामध्ये सिद्ध झाले आहे. याचे उद्घाटन १५ नोव्हेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. या रेल्वे स्थानकाला ‘राणी कमलापती’ नाव देण्यात येणार आहे.