पंतप्रधान मोदी यांनी व्हॅटिकनमध्ये घेतली पोप फ्रान्सिस यांची भेट !

‘पोप फ्रान्सिस यांच्याशी अतिशय प्रेमळ भेट झाली. मला त्यांच्याशी अनेक सूत्रांवर चर्चा करण्याची संधी मिळाली आणि त्यांना भारतभेटीचे निमंत्रणही दिले’, असे पंतप्रधान मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांच्या भेटीनंतर सांगितले.

पंतप्रधान ४ दिवसांच्या विदेश दौर्‍यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ दिवसांच्या विदेश दौर्‍यावर गेले आहेत. २९ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ते इटलीची राजधानी रोम येथे पोचले. ते २९ ते ३१ ऑक्टोबरच्या दुपारपर्यंत इटलीमध्ये असतील.

पाटलीपुत्र (बिहार) येथे वर्ष २०१३ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये झालेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणी ९ जण दोषी

पाटलीपुत्र येथील गांधी मैदानात २७ ऑक्टोबर २०१३ या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेच्या वेळी झालेल्या बाँबस्फोटांच्या प्रकरणी एन्.आय.ए.च्या विशेष न्यायालयाने १० आरोपींपैकी फखरुद्दीन नावाच्या आरोपीची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

गोवा ‘विकासाचा आदर्श नमुना (मॉडेल)’  म्हणून ओळखला जाणार !  नरेंद्र मोदी, पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑनलाईन’ पद्धतीने गोमंतकियांशी साधला संवाद

भारतामध्ये झाले १०० कोटी नागरिकांचे लसीकरण !

यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भारताने इतिहास रचला असून हा भारतीय विज्ञान, उद्योग आणि भारतियांच्या सामूहिक भावना यांचा विजय आहे’, असे म्हटले आहे.

बांगलादेश येथील दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई व्हावी !

हिंदूंवर आक्रमण करणार्‍या दंगलखोर मुसलमानांवर कठोर कारवाई होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशा मागणीचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आजरा येथे तहसीलदार विकास आहिर यांना देण्यात आले.

भारताचे पंतप्रधान मोदी यांना वाटले, तर ते पाकिस्तान क्रिकेट मंडळ बंद करू शकतात ! – पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा

जर असे असेल, तर भारताच्या पंतप्रधानांनी हे काम करावे, असेच भारतियांना वाटेल !

हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी जलसमाधी घेण्याची घोषणा करणारे महंत परमहंस दास यांची माघार

वर्ष २०२३ मध्ये भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच असल्याने अशा उपोषणाची आवश्यकता भासणार नाही; मात्र हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी अशा संत-महंतांनी देशभरात जागृती करून हिंदूंना संघटित केले पाहिजे !

‘पंतप्रधान डिजिटल आरोग्य मिशन’चे पंतप्रधान मोदी यांच्याकडून लोकार्पण

देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणार ‘आरोग्य ओळखपत्र’ !

जो बायडेन यांनी पंतप्रधान मोदी यांना भेट दिल्या १५७ प्राचीन भारतीय कलाकृती !

पंतप्रधान मोदी म्हणाले की, कलाकृती आणि पुरातन वस्तू कोणत्याही देशाचा अमूल्य ठेवा आहे. अशा कलाकृती आणि वस्तू यांची होणारी चोरी, करण्यात येणारा अवैध व्यापार अन् तस्करी यांचा सामना करण्यासाठी भारत आणि अमेरिका कटीबद्ध आहेत.