लोकायुक्त कायद्यासाठी राज्यात पुन्हा मोठ्या जनआंदोलनाची आवश्यकता ! – अण्णा हजारे

देवेंद्र फडणवीस यांनी लोकायुक्त कायदा करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांनीही लोकायुक्त कायदा करण्याचे आश्वासन दिले; मात्र अडीच वर्षे उलटूनही त्यावर काहीच कारवाई झालेली नाही….

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात संस्कृतच्या वर्गाचे आयोजन !

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने प्राथमिक स्तरावरील संस्कृत अभ्यासक्रमाचे वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये लिहिणे, वाचणे आणि बोलणे अशा प्रकारे संस्कृत भाषा शिकवण्यात येईल.

५० अधिवक्त्यांकडून राज ठाकरे यांची भेट !

मनसेच्या जनहित आणि विधी विभागाचे सरचिटणीस अधिवक्ता किशोर शिंदे यांनी भोंग्यांच्या विरोधातील आंदोलनाच्या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांना अधिवक्त्यांनी केलेल्या सहकार्याची माहिती या वेळी दिली.

‘मुंबई पीस फेस्टिव्हल २०२२’ च्या विरोधात हिंदु जनजागृती समितीची पोलीस आयुक्तांकडे तक्रार !

अंधश्रद्धा पसरवणार्‍या अशा कार्यक्रमामध्ये अनेक हिंदूंना धर्मांतरीत केल्याच्या घटनाही घडतात. ‘महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असतांनाही अंधश्रद्धा पसरवणार्‍या अशा कार्यक्रमाला अनुमती कोणत्या आधारावर दिली ?’ – हिंदु जनजागृती समिती

मुंबई येथे मशिदीत ध्वनीक्षेपकावरून नमाजपठण करणाऱ्या इमामाविरुद्ध गुन्हा नोंद !

१३ मे या दिवशी पार्कसाईट पोलीस ठाणे हद्दीतील अक्सा मशिदीमध्ये पहाटे ५.३० वाजता इमाम अब्दुल माजिद महमंद दिलशाद शेख याने ध्वनीक्षेपकावरून नमाजपठण केले.

शस्त्रकर्म खासगी रुग्णालयात करण्याविषयीची माजी गृहमंत्र्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली !

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जे.जे. रुग्णालयात अद्ययावत् सुविधांचा अभाव असल्याने खांद्यावरील शस्त्रकर्म खासगी रुग्णालयात करण्याची अनुमती मिळावी, अशी सत्र न्यायालयाकडे मागणी केली होती.

१४ ते १७ मे या कालावधीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून विशाळगड ते पन्हाळगड या धारातीर्थ गडकोट मोहिमेला प्रारंभ !

१४ मे ते १७ मे या कालावधीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून विशाळगड ते पन्हाळगड या धारातीर्थ गडकोट मोहिमेला प्रारंभ होणार असून पावनखिंड मार्गातून ही मोहीम पुढे जाणार आहे.

वाशी (नवी मुंबई) येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन कक्षाचे आयोजन !

वाशी, नवी मुंबई येथे बीएएन्एम् बांधकाम व्यावसायिकांच्या वतीने १३ ते १६ मे २०२२ या कालावधीत प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन कक्ष उभारण्यात आला आहे.

दाऊदचा हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना मारण्याचा कट ! – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा

कुणाचेही हिंदूंकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धाडस होणार नाही, असे  संघटन हिंदूंनी निर्माण करणे आवश्यक आहे !

संपानंतर एस्.टी.च्या १३ सहस्र गाड्या सेवारत; प्रवाशांच्या संख्येत मात्र घट !

राज्य मार्ग परिवहन महामंडळात १५० इलेक्ट्रिक बस येणार !