स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात संस्कृतच्या वर्गाचे आयोजन !

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

मुंबई – स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने प्राथमिक स्तरावरील संस्कृत अभ्यासक्रमाचे वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये लिहिणे, वाचणे आणि बोलणे अशा प्रकारे संस्कृत भाषा शिकवण्यात येईल. वर्गातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांना स्मारकाच्या वतीने प्रमाणपत्र दिले जाईल. प्रत्येक शनिवारी असे एकूण १५ शनिवार हे वर्ग होतील. वय वर्षे ७ ते १३ आणि १४ वर्षांच्या वर असे दोन वयोगट असतील. अधिक माहितीसाठी स्मारकाच्या कार्यालयात दूरभाष क्रमांक (०२२) २४४६५८७७ यावर संपर्क साधावा.