हिंदु धर्मस्थळांसाठी आमची सांस्कृतिक लढाई चालूच रहाणार ! – अधिवक्ता मदन मोहन यादव, वाराणसी जिल्हा न्यायालय

ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण का रोखले जात आहे ? या मशिदीमध्ये असे काय आहे, जे लपवले जात आहे ? सर्वांसमोर सत्य येणे आवश्यक आहे. या मशिदीचे सर्वेक्षण ज्यांनी रोखले, त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सरकारने कारवाई करायला हवी !

पोलिसांना १० मिनिटे बाजूला करा, अकबरुद्दीन ओवैसी यांना औरंगजेबाकडे पाठवतो ! – भाजपचे आमदार नितेश राणे

खासदार संजय राऊत यांची ओवैसी यांना चेतावणी “तुम्हालाही एक दिवस त्याच कबरीमध्ये जावे लागेल !”

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील ६ जागांची निवडणूक घोषित !

राज्यसभेच्या ५७ जागांची निवडणूक घोषित करण्यात आली आहे. २१ जून ते १ ऑगस्ट या कालावधीत या जागांचा कार्यकाळ संपत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ जागांचा समावेश आहे.

ख्रिस्ती मिशनर्‍यांचा धर्मांतराचा ‘मुंबई पीस फेस्टिव्हल २०२२’ हा वादग्रस्त कार्यक्रम रहित !

ख्रिस्ती धर्मांतराविषयी जागरूकपणे सनदशीर मार्गाने विरोध करणार्‍या ‘सॅफ्रॉन थिंक टँक’चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे अभिनंदन !

मंत्रीमंडळाची बैठक चालू असतांना मंत्रालयातील वीजपुरवठा खंडित !

मंत्रालयाला बेस्टकडून वीजपुरवठा होतो. वीजपुरवठा खंडित झाल्याने मंत्रालयातील सर्व विभागांचे संगकीय कामकाज ठप्प झाले.

नांदेड, मनमाड आणि नवी मुंबई येथे खलिस्तानी आतंकवाद्यांचे छुपे गट सक्रीय !

नांदेड ते पंजाब येथील अनेक भागांमध्ये खलिस्तानवाद्यांचे ‘स्लीपर सेल’ कार्यरत आहे. या माध्यमातून युवकांना खलिस्तानी उदिष्टांसाठी सिद्ध करण्यात येत आहे.

मुंबईतील बहुसंख्य हिंदु विद्यार्थी असलेल्या ‘सेंट अँड्र्यूज मराठी चर्च’च्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवले जाणार बायबल !

बहुसंख्य विद्यार्थी हिंदु असतांना त्यांना भगवद्गीता शिकवण्यापेक्षा बायबल शिकवणाऱ्या ख्रिस्त्यांच्या या षड्यंत्राच्या विरोधात हिंदूंनी जागरूक होऊन याविषयी शिक्षण विभागाकडे तक्रार करावी !

राज ठाकरे यांना पत्राद्वारे जीवे मारण्याच्या धमकी  

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रामध्ये उर्दू शब्दांचा वापर करण्यात आला आहे. याविषयी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ११ मे या दिवशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे याविषयीची तक्रार केली.

मांघर (जिल्हा सातारा) हे देशातील पहिले मधाचे गाव होणार ! – सुभाष देसाई, उद्योगमंत्री

सातारा जिल्ह्यातील मांघर येथे ‘मधाचे गाव’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. या उपक्रमातून मधुपालनाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. राज्यशासनाच्या राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने १६ मे या दिवशी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ केला जाणार आहे.

कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे भारतात औषधांचा तुटवडा !

पुढील आपत्काळात औषधेच मिळणार नाहीत, याविषयी अनेक संत वारंवार सांगत आहेत. लोकहो, अशा स्थितीला सामोरे जाण्यास तुम्ही सिद्ध आहात का ?