शस्त्रकर्म खासगी रुग्णालयात करण्याविषयीची माजी गृहमंत्र्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली !

अनिल देशमुख

मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जे.जे. रुग्णालयात अद्ययावत् सुविधांचा अभाव असल्याने खांद्यावरील शस्त्रकर्म खासगी रुग्णालयात करण्याची अनुमती मिळावी, अशी सत्र न्यायालयाकडे मागणी केली होती. (सरकारी रुग्णालयांमध्ये सुविधांचा अभाव असल्याचे माजी गृहमंत्र्यांनी सांगणे हे सरकारला लज्जास्पद नव्हे का ? – संपादक) त्यांची ही मागणी फेटाळून लावत जे.जे. रुग्णालयातच उपचार करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. ‘खासगी रुग्णालयात उपचारांची आवश्यकता नाही, जे.जे. रुग्णालयातही उपचार होऊ शकतात’, असे अंमलबजावणी संचालनालयाने दिलेल्या अहवालामध्ये नमूद केले होते. त्यावर न्यायालयाने वरील निर्णय दिला.