मुंबई येथे मशिदीत ध्वनीक्षेपकावरून नमाजपठण करणाऱ्या इमामाविरुद्ध गुन्हा नोंद !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – ध्वनीक्षेपकावरून नमाजपठण करणाऱ्या इमामाविरुद्ध पार्कसाईट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. १३ मे या दिवशी पार्कसाईट पोलीस ठाणे हद्दीतील अक्सा मशिदीमध्ये पहाटे ५.३० वाजता इमाम अब्दुल माजिद महमंद दिलशाद शेख याने ध्वनीक्षेपकावरून नमाजपठण केले. या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश यांनुसार गुन्हा नोंद केला आहे. या गुन्ह्यात वापरलेला ध्वनीवर्धक आणि ध्वनीक्षेपक पोलिसांनी हस्तगत केला आहे.