दाऊदचा हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना मारण्याचा कट ! – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा

मुंबई – जिहादी आतंकवादी दाऊद इब्राहिम याने भारतातील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांची हत्या करण्याचा कट आखला आहे, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने दिली. गुंडांच्या टोळ्यांचा (अंडरवर्ल्डचा) पैसा हवालाच्या माध्यमातून परदेशात पाठवणारा गुंड छोटा शकीलचे दोन मेव्हणे आरीफ आणि शब्बीर यांच्या चौकशीतून हा कट उघडकीस आला.

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ९ मे या दिवशी नालासोपारा, तसेच मुंबईसह २७ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. यातील १८ जणांची कसून चौकशी चालू आहे. त्यांपैकी आरीफ आणि शब्बीर शेख या दोघांच्या विरोधात ठोस पुरावे मिळाल्याने त्यांना १३ मे या दिवशी पहाटे अटक करण्यात आली. वर्ष १९९३ च्या बाँबस्फोट प्रकरणात आरीफ आणि शब्बीर हे दोघेही आरोपी होते. देशात घातपात घडवण्यासाठी दाऊद कट रचत असून या कटात हे दोघेही सहभागी असल्याचे उघड झाले आहे.

खंडणी, अमली पदार्थांची तस्करी, तसेच आतंकवादी कृत्ये करणे, या गुन्ह्यांत दोन्ही आरोपींचा सहभाग असल्याचे पुरावे यंत्रणेला मिळाले आहेत. अधिक अन्वेषणासाठी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने २० मे पर्यंत त्यांना कोठडी सुनावली आहे.

संपादकीय भूमिका

कुणाचेही हिंदूंकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धाडस होणार नाही, असे  संघटन हिंदूंनी निर्माण करणे आवश्यक आहे !