नागरिक घाबरून घराबाहेर पडले
पालघर – डहाणू, तलासरी तालुक्यातील गावांना १५ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ४.४७ वाजता ३.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. त्याचा केंद्रबिंदू भूमीखाली ५ किलोमीटर खोल डहाणू तालुक्यातील कंक्राटीजवळ असल्याचे सांगण्यात आले आहे. भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिक घाबरून घराबाहेर पडले.