तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूर येथे ‘टोकन दर्शन’ व्यवस्थेसाठी ‘टी.सी.एस्.’ आस्थापनास प्रस्ताव

पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शन रांगेसाठी ‘टोकन दर्शन’प्रणाली प्रस्तावित आहे. या संदर्भात अनेक मोठ्या मंदिराशी संपर्क साधला असता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टी.सी.एस्.), बेंगलोर हे आस्थापन सेवाभावी तत्त्वावर टोकन प्रणाली विनामूल्य उपलब्ध करून देत असल्याची माहिती मिळाली आहे. या आस्थापनाने सेवाभावी तत्त्वावर तिरुपती, शिर्डी आणि अयोध्येचे मंदिर येथे विनामूल्य टोकन प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सदर आस्थापनाशी लेखी पत्रव्यवहार करून संपर्क साधण्यात येत आहे. त्यांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीसाठी टोकन दर्शन व्यवस्थेकामी ‘सॉफ्टवेअर’ उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.