केवळ काशीच नव्हे, तर बळकावलेली ३६ सहस्र मंदिरे पुन्हा मिळवल्याविना हिंदू थांबणार नाहीत ! – सुरेश चव्हाणके, सुदर्शन न्यूज

आताही आपण मंदिरे उभी करत आहोत; पण मंदिरांच्या रक्षणासाठी आपण काय व्यवस्था उभी करणार आहोत ? याचा विचार हिंदूंनी करायला हवा. इतिहासात झालेल्या चुका पुन्हा होता कामा नयेत.

मुंबई येथे नौदलाच्या उदयगिरी आणि सुरत या युद्धनौकांचे जलावतरण !

भारतीय नौदलासाठी ‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स’ या जहाजबांधणी कारखान्यात बांधण्यात आलेली विशाखापट्टणम् श्रेणीतील अखेरची विनाशिका ‘सुरत’ आणि निलगिरी श्रेणीतील फ्रिगेट्स ‘उदयगिरी’चे जलावतरण झाले.

संभाजीनगर येथील औरंगजेबाचे थडगे उद्ध्वस्त करण्याची मनसेची मागणी !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संभाजीनगर येथील औरंगजेबाचे थडगे उद्ध्वस्त करण्याची मागणी शिवसेनेकडे केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका जुन्या मुलाखतीचा संदर्भ देत ही मागणी करण्यात आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीविषयी सर्वाेच्च न्यायालयाची महाराष्ट्र शासनाला विचारणा !

ज्या ठिकाणी अधिक पाऊस नसतो, त्या ठिकाणी निवडणुका घेण्यास काय हरकत आहे ? अशी विचारणा सर्वाेच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला केली आहे. याविषयी जिल्हानिहाय आढावा घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्याचे निर्देश न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला दिले आहेत.

मनसेचे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या जामिनावर १९ मेला निकाल !

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि मनसेचे पदाधिकारी संतोष धुरी यांच्या जामिनावरील मुंबई सत्र न्यायालयामधील सुनावणी १७ मे या दिवशी पूर्ण झाली. न्यायालयाने यावरील निर्णय राखून ठेवला असून १९ मे या दिवशी यावरील निर्णय देणार आहे.

खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची लूटमार रोखण्यात परिवहन विभाग उदासीन !

परिवहन विभाग नागरिकांच्या सेवेसाठी कि खासगी ट्र्रॅव्हल्स्च्या फायद्यासाठी ?

मुंबईत पहिल्या भारतीय आंतरराष्ट्रीय क्रूझ परिषदेचे आयोजन !

सोनोवाल यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. भविष्यात भारताला ‘क्रूझ हब’ म्हणून ओळख निर्माण करून देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे सोनोवाल यांनी सांगितले.

केतकी चितळे यांनी शरद पवार यांच्याविषयी केलेली पोस्ट २ वर्षांपूर्वीची !

अभिनेत्री केतकी चितळे यांनी शरद पवार यांच्याविषयी केलेली आक्षेपार्ह पोस्ट वर्ष २०२० मधील असल्याचे पोलिसांच्या अन्वेषणात उघड झाले आहे. त्या वेळी ही पोस्ट अधिक प्रसारित झाली नव्हती. आता ही पोस्ट पुनर्प्रसारित करण्यामागे काही षड्यंत्र आहे का ? याचा शोध पोलीस घेत आहेत.

चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या २ धर्मांधांना शिवडी येथून अटक

चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या २ धर्मांधांना पोलिसांनी शिवडी येथून अटक केली आहे. या वेळी ४३० किलो भेसळयुक्त चहा पावडर कह्यात घेण्यात आली आहे. ८५ सहस्र रुपये किंमतीची ही चहा पावडर आहे.

अवैधरित्या तिकीट विक्री करणाऱ्या दलालांविरुद्ध मध्य रेल्वेची कारवाई !

रेल्वेच्या तिकिटांची अवैधरित्या विक्री करणाऱ्या दलालांवर मध्य रेल्वेने कारवाई केली आहे. मध्य रेल्वेचे दलालविरोधी पथक आणि आर्.पी.एफ. यांच्या साहाय्याने वाणिज्य शाखेने ही मोहीम राबवली.