वाशी (नवी मुंबई) येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन कक्षाचे आयोजन !

वाशी (नवी मुंबई) – येथे बीएएन्एम् बांधकाम व्यावसायिकांच्या वतीने १३ ते १६ मे २०२२ या कालावधीत प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन कक्ष उभारण्यात आला आहे. व्यावसायिकांनी तो विनामूल्य लावण्याची अनुमती दिली आहे. या प्रदर्शनकक्षात साधनेचे महत्त्व, सनातन संस्था करत असलेले राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भातील कार्य, ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे महत्त्व सांगून प्रबोधन करण्यात येत आहे. सनातनचे वाचक, हितचिंतक आणि धर्माभिमानी यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रदर्शनाचे स्थळ : बीएएन्एम् एक्झिबिशन (प्रॉपर्टी एक्झिबिशन), सिडको एक्झिबिशन सेंटरच्या समोर, कक्ष क्रमांक इ – १०, वाशी, नवी मुंबई.

वेळ : सकाळी १० ते रात्री ९