१४ ते १७ मे या कालावधीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून विशाळगड ते पन्हाळगड या धारातीर्थ गडकोट मोहिमेला प्रारंभ !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

मुंबई – १४ मे ते १७ मे या कालावधीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून विशाळगड ते पन्हाळगड या धारातीर्थ गडकोट मोहिमेला प्रारंभ होणार असून पावनखिंड मार्गातून ही मोहीम पुढे जाणार आहे. लाखाहून अधिक शिवशंभूप्रेमी यात सहभागी होणार असून या चार दिवसांत पायी प्रवास करण्यात येणार आहे.

मोहिमेत सहभागी होणारे धारकरी चार दिवस पुरेल एवढी शिदोरी, तसेच पाणी, वस्त्र आणि अंथरूण-पांघरूण घेत मोहिमेत सहभागी होतात. विशेष म्हणजे सांगली येथून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजीराव भिडेगुरुजीसुद्धा या मोहिमेत सहभाग दर्शवणार आहेत. खरेतर त्यांचा अपघात झाल्याने त्यांचे नुकतेच शस्त्रकर्म झालेले आहे, तरीही ते यात सहभागी होणार आहेत. श्री शिवछत्रपतींच्या वृत्तीची अवघी तरुण पिढी निर्माण व्हावी, यासाठी श्री शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या आणि अनेक हुतात्मांच्या बलीदानाने धारातीर्थ झालेल्या गडकोटांच्या मोहिमा प्रतिवर्षी आयोजित करण्यात येतात.