मनसेचे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या जामिनावर १९ मेला निकाल !

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि मनसेचे पदाधिकारी संतोष धुरी यांच्या जामिनावरील मुंबई सत्र न्यायालयामधील सुनावणी १७ मे या दिवशी पूर्ण झाली. न्यायालयाने यावरील निर्णय राखून ठेवला असून १९ मे या दिवशी यावरील निर्णय देणार आहे.

खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची लूटमार रोखण्यात परिवहन विभाग उदासीन !

परिवहन विभाग नागरिकांच्या सेवेसाठी कि खासगी ट्र्रॅव्हल्स्च्या फायद्यासाठी ?

मुंबईत पहिल्या भारतीय आंतरराष्ट्रीय क्रूझ परिषदेचे आयोजन !

सोनोवाल यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. भविष्यात भारताला ‘क्रूझ हब’ म्हणून ओळख निर्माण करून देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे सोनोवाल यांनी सांगितले.

केतकी चितळे यांनी शरद पवार यांच्याविषयी केलेली पोस्ट २ वर्षांपूर्वीची !

अभिनेत्री केतकी चितळे यांनी शरद पवार यांच्याविषयी केलेली आक्षेपार्ह पोस्ट वर्ष २०२० मधील असल्याचे पोलिसांच्या अन्वेषणात उघड झाले आहे. त्या वेळी ही पोस्ट अधिक प्रसारित झाली नव्हती. आता ही पोस्ट पुनर्प्रसारित करण्यामागे काही षड्यंत्र आहे का ? याचा शोध पोलीस घेत आहेत.

चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या २ धर्मांधांना शिवडी येथून अटक

चहा पावडरमध्ये भेसळ करणाऱ्या २ धर्मांधांना पोलिसांनी शिवडी येथून अटक केली आहे. या वेळी ४३० किलो भेसळयुक्त चहा पावडर कह्यात घेण्यात आली आहे. ८५ सहस्र रुपये किंमतीची ही चहा पावडर आहे.

अवैधरित्या तिकीट विक्री करणाऱ्या दलालांविरुद्ध मध्य रेल्वेची कारवाई !

रेल्वेच्या तिकिटांची अवैधरित्या विक्री करणाऱ्या दलालांवर मध्य रेल्वेने कारवाई केली आहे. मध्य रेल्वेचे दलालविरोधी पथक आणि आर्.पी.एफ. यांच्या साहाय्याने वाणिज्य शाखेने ही मोहीम राबवली.

लोकायुक्त कायद्यासाठी राज्यात पुन्हा मोठ्या जनआंदोलनाची आवश्यकता ! – अण्णा हजारे

देवेंद्र फडणवीस यांनी लोकायुक्त कायदा करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांनीही लोकायुक्त कायदा करण्याचे आश्वासन दिले; मात्र अडीच वर्षे उलटूनही त्यावर काहीच कारवाई झालेली नाही….

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात संस्कृतच्या वर्गाचे आयोजन !

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने प्राथमिक स्तरावरील संस्कृत अभ्यासक्रमाचे वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये लिहिणे, वाचणे आणि बोलणे अशा प्रकारे संस्कृत भाषा शिकवण्यात येईल.

५० अधिवक्त्यांकडून राज ठाकरे यांची भेट !

मनसेच्या जनहित आणि विधी विभागाचे सरचिटणीस अधिवक्ता किशोर शिंदे यांनी भोंग्यांच्या विरोधातील आंदोलनाच्या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांना अधिवक्त्यांनी केलेल्या सहकार्याची माहिती या वेळी दिली.

‘मुंबई पीस फेस्टिव्हल २०२२’ च्या विरोधात हिंदु जनजागृती समितीची पोलीस आयुक्तांकडे तक्रार !

अंधश्रद्धा पसरवणार्‍या अशा कार्यक्रमामध्ये अनेक हिंदूंना धर्मांतरीत केल्याच्या घटनाही घडतात. ‘महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असतांनाही अंधश्रद्धा पसरवणार्‍या अशा कार्यक्रमाला अनुमती कोणत्या आधारावर दिली ?’ – हिंदु जनजागृती समिती