मुंबईत पहिल्या भारतीय आंतरराष्ट्रीय क्रूझ परिषदेचे आयोजन !

सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते पहिल्या भारतीय आंतरराष्ट्रीय क्रूझ परिषदेचे उद्घाटन

मुंबई – भारतात जलमार्गाचा अधिकाधिक वापर होऊन जहाज (क्रूझ) पर्यटनाला चालना मिळावी आणि यातून लाखो लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी मुंबईत पहिल्या भारतीय आंतरराष्ट्रीय जहाज (क्रूझ) परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय बंदरे, शिपिंग आणि जलमार्गमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली. सोनोवाल यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. भविष्यात भारताला ‘क्रूझ हब’ म्हणून ओळख निर्माण करून देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे सोनोवाल यांनी सांगितले.

केंद्र सरकार, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि फिक्की यांच्याकडून क्रूझ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी कोकण किनारपट्टीजवळील लाईट हाऊसचे ऑनलाईन अनावरण करण्यात आले. या वेळी माध्यमांशी बोलतांना सोनोवाल म्हणाले, ‘‘भारतात समुद्री पर्यटन आणि नदी पर्यटन यांना चालना देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे.’’