भाजपच्‍या वतीने मुंबई येथे १९ ऑगस्‍टपासून भव्‍य मंगळागौर स्‍पर्धेचे आयोजन !

नवीन पिढीला आपली परंपरा समजावी आणि जुने खेळ आजच्‍या पिढीला समजावेत यासाठी येथील मुंबई भाजपच्‍या वतीने १९ ऑगस्‍ट ते २ सप्‍टेंबरपर्यंत आधुनिकतेसमवेत परंपरेचा सुरेख गोफ विणणार्‍या भव्‍य मंगळागौर स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले आहे.

महाराष्ट्रात १३ ते १५ ऑगस्ट कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अभियान !

महाराष्ट्रात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान राबवले जाणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयात एका कार्यक्रमात या अभियानाची घोषणा केली.

मराठा क्रांती मोर्चामुळे शीव-पनवेल महामार्गावर वाहतूककोंडी !

शेकडो कार्यकर्ते आल्‍याने शीव-पनवेल महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी ९ ऑगस्‍ट या दिवशी झाली.

जावेद अख्‍तर यांच्‍यावरील कारवाईच्‍या स्‍थगितीस सत्र न्‍यायालयाचा नकार !

८ ऑगस्‍ट या दिवशी यावर सुनावणी झाली. पुढील सुनावणी २४ ऑगस्‍ट या दिवशी होणार आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्‍या आयुक्‍तांना ‘ईडी’ची नोटीस !

मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्‍त दिलीप ढोले यांना आर्थिक अपहाराच्‍या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्‍स देण्‍यात आला आहे. ठाणे येथील बांधकाम व्‍यावसायिकाशी एका कथित आर्थिक घोटाळ्‍याच्‍या प्रकरणात जबाब नोंदवण्‍यासाठी हा समन्‍स पाठवण्‍यात आला आहे. 

राज्‍यात ‘माझी माती, माझा देश’ अभियानाद्वारे राष्‍ट्रपुरुषांचे कार्य सर्वसामान्‍यांपर्यंत पोचवले जाणार !

अगणित हुतात्‍म्‍यांचा त्‍याग आणि बलीदान यांमुळे भारताला स्‍वातंत्र्य मिळाले. ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाद्वारे स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षाचा आपण समारोप करणार आहोत. प्रत्‍येक नागरिकाच्‍या मनात स्‍वदेश, स्‍वधर्म आणि स्‍वाभिमान जागवण्‍याचे काम या अभियानाच्‍या माध्‍यमातून होणार आहे, असे उद़्‍गार मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. केंद्रशासनाच्‍या ‘आझादी का अमृत महोत्‍सवा’च्‍या सांगतेच्‍या निमित्ताने देशभरात ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान राबवले जाणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्‍या दुरवस्‍थेविरोधात बोंबाबोंब आंदोलन !

या संदर्भात मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्‍हाण, पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे आणि खासदार श्रीरंग बारणे, महिला आणि बालकल्‍याण मंत्री अदिती तटकरे यांनाही संदेश पाठवण्‍यात आले.

महाराष्‍ट्राचे वर्ष २०२४-२५ पर्यंत २ सहस्र ७९५ मेगावॅट सौर वीजनिर्मितीचे उद्दिष्‍ट !

राज्‍यात ५ प्रकल्‍पांची कामे वेगाने चालू आहेत. यामध्‍ये प्रत्‍येक प्रकल्‍पाची वीजनिर्मितीची क्षमता निश्‍चित करण्‍यात आली असून वर्ष २०२४-२५ पर्यंत टप्‍प्‍याटप्‍प्‍याने हे उद्दिष्‍ट पूर्ण करण्‍यात येणार आहे.

विलंब झाल्‍यामुळे संतप्‍त प्रवाशांनी दिवा स्‍थानकावर लोकलगाडी रोखून धरली !

ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला निघाली होती; मात्र विलंब झाल्‍याने दिवा रेल्‍वेस्‍थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली. अनेक प्रवासी रेल्‍वे डब्‍याला लोंबकळत असल्‍यामुळे काही महिलांनी मोटरमनच्‍या केबिनमध्‍ये शिरून लोकल थांबवायला लावली.

हिंदु आणि ब्राह्मण द्वेष्‍टे प्रा. हरि नरके यांचे निधन !

धर्मशास्‍त्राचा अभ्‍यास न करता हिंदु धर्मातील प्रथा-परंपरा यांविरोधात त्‍यांनी अत्‍यंत धर्मद्रोही आणि एकांगी लिखाण केले. त्‍यांच्‍या हिंदुद्वेषी विचारांमुळे त्‍यांच्‍याशी त्‍याच विचारांची पुरोगामी मंडळी जोडली होती.