स्पर्धेसाठी मराठी पारंपरिक वेशभूषा अनिवार्य !
मुंबई, १० ऑगस्ट (वार्ता.) – नवीन पिढीला आपली परंपरा समजावी आणि जुने खेळ आजच्या पिढीला समजावेत यासाठी येथील मुंबई भाजपच्या वतीने १९ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत आधुनिकतेसमवेत परंपरेचा सुरेख गोफ विणणार्या भव्य मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत विजेत्याला पहिले पारितोषिक ३ लाख ५१ सहस्र, तर दुसरे पारितोषिक २ लाख ११ सहस्र रुपयेे आहे. स्पर्धेसाठी गटाची नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक १६ ऑगस्ट सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. सादरीकरणासाठी प्रत्येक गटाला १० ते १२ मिनिटे मिळतील.