विलंब झाल्‍यामुळे संतप्‍त प्रवाशांनी दिवा स्‍थानकावर लोकलगाडी रोखून धरली !

मोटरमनच्‍या केबिनमध्‍ये शिरणार्‍या ४ महिला कह्यात !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – सकाळी ६.२३ वाजता येणारी लोकलगाडी अर्धा घंटा विलंबाने आल्‍यामुळे ९ ऑगस्‍ट या दिवशी मुंबईतील दिवा रेल्‍वेस्‍थानकावर संतप्‍त प्रवाशांनी १० मिनिटे रेल्‍वे रोखून धरली. नियमित फलाट क्रमांक ४ वर येणारी ही रेल्‍वे फलाट क्रमांक २ वर आली. त्‍यामुळे प्रवाशांची पळापळ होऊन रेल्‍वेस्‍थानकावर गोंधळ निर्माण झाला.

ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला निघाली होती; मात्र विलंब झाल्‍याने दिवा रेल्‍वेस्‍थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली. अनेक प्रवासी रेल्‍वे डब्‍याला लोंबकळत असल्‍यामुळे काही महिलांनी मोटरमनच्‍या केबिनमध्‍ये शिरून लोकल थांबवायला लावली. या वेळी रेल्‍वे पोलिसांनी परिस्‍थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलिसांनी ४ महिलांना कह्यात घेतले आहे.