उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा पुरवठा वेळेत करा अन्यथा मोर्चा काढू ! – मंगेश तळवणेकर, अध्यक्ष, विठ्ठल-रखुमाई संघटना

मूलभूत सुविधांसाठी जनतेला मागणी करावी लागणे आणि त्यांच्या पूर्ततेसाठी चेतावणी द्यावी लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूमीपुत्रांची भूमी हडप करणारे अधिकारी आणि दलाल यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी !

निवेदनात म्हटले आहे की, बनावट कुळे उभी करून जिल्ह्यातील भूमीपुत्रांच्या भूमी हडप करण्याची विकृती जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे.

उजनी (जिल्हा सोलापूर) धरणातील दूषित पाण्याचा प्रश्न कायम !

सहस्रावधी नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या गंभीर प्रश्नामध्ये पर्यावरण मंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून उजनी धरणातील दूषित पाण्यावर कायमस्वरूपी उपाययोजना काढावी, अशी जनतेची अपेक्षा आहे. तसेच दिरंगाई करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईही व्हायला हवी !

पुरोहित संतोष पाठक यांची हत्या करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी ! – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांचे मिरज प्रांताधिकारी यांना निवेदन

ब्रह्मवृंद समाजाचे काश्मिरी पंडितांसारखे हाल होऊ नयेत, तसेच पुरोहित संतोष पाठक यांची हत्या करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी निवेदन देण्यात आले.

सातार्‍यात अज्ञातांनी केलेल्या आक्रमणामध्ये अधिवक्त्याचा डोळा कायमस्वरूपी निकामी !

अज्ञात युवकांच्या आक्रमणात अधिवक्त्याचा डोळा निकामी होण्यापर्यंत त्यांना मारहाण होते ही घटना पोलिसांचा धाक संपल्याचे लक्षण आहे

चित्रपट करमुक्त करा ! – भाजप चित्रपट कामगार आघाडी, सातारा

‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘पावनखिंड’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत; मात्र याचे तिकीटदर सामान्य लोकांना न परवडणारे असल्याने हे चित्रपट करमुक्त करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ करमुक्त करण्याविषयी भाजपच्या ९२ आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र !

अर्थमंत्री अजित पवार यावर सकारात्मक भूमिका घेतील, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानभवनात पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले आहे.

कोपरगाव (जिल्हा नाशिक) येथे ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट अखेर प्रदर्शित होणार !

द कश्मीर फाइल्स हा चित्रपट दाखवला जात नसल्याने येथील हिंदुत्वनिष्ठांनी या संदर्भात ‘सुदेश पिक्चर पॅलेस’ या चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांकडे याविषयी जोरदार मागणी करून हा चित्रपट प्रदर्शित करण्यास भाग पाडले आहे.

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे ‘द कश्मीर फाइल्स’ प्रदर्शित करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांचे चित्रपटगृहांना निवेदन : हिंदुत्वनिष्ठांच्या रेट्यामुळे चित्रपट प्रदर्शित !

चित्रपट लागला नाही, हे लक्षात येताच पुढाकार घेऊन सर्व हिंदुत्वनिष्ठांना एकत्र करणार्‍या ‘हिंदवी स्वराज्य समूह गटा’चे आणि निवेदन देयासाठी सहभागी सर्व हिंदुत्वनिष्ठांचे अभिनंदन ! हिंदूंनी जागृत होऊन आवाज उठल्यास यश मिळते त्याचे हे उदाहरण आहे !

सावदा (जिल्हा जळगाव) येथील सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीवर स्वस्तिक, तुळस आणि वारकरी यांची चित्रे रंगवून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचा अश्लाघ्य प्रकार !

अन्य धर्मियांच्या पवित्र चिन्हांच्या संदर्भात असा प्रकार करण्याचे कुणाचे धाडस झाले असते का ?