पुरोहित संतोष पाठक यांची हत्या करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी ! – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांचे मिरज प्रांताधिकारी यांना निवेदन

प्रांताधिकारी समीर शिंगटे (डावीकडे) यांना निवेदन देतांना ओंकार शुक्ल (उजवीकडे), तसेच अन्य ब्रह्मवृंद

मिरज, ६ एप्रिल (वार्ता.) – आंबेजोगाई येथे गुढीपाडव्याच्या दिवशी संतोष पाठक या पुरोहितांची हत्या करण्यात आली. तरी महाराष्ट्रातील ब्रह्मवृंद समाजाचे काश्मिरी पंडितांसारखे हाल होऊ नयेत, तसेच पुरोहित संतोष पाठक यांची हत्या करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी ब्राह्मण परिवार आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ तालुका मिरज यांच्या वतीने मिरज प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी ब्राह्मण परिवाराचे श्री. ओंकार शुक्ल, ब्राह्मण महासंघाचे श्री. श्रेयस गाडगीळ, अपर्णा कोल्हटकर, सायली हिप्परगी, जानकी जोशी, सर्वश्री अरविंद रूपलग, विश्वेश बेडगकर, भास्कर कुलकर्णी उपस्थित होते.