धर्मांध रिक्शाचालकाकडून गतीमंद महिलेवर अत्याचार !

वासनांध धर्मांध !

(डावीकडून )आरोपी फैझल खान

ठाणे, ११ एप्रिल (वार्ता.) – डोंबिवली येथे ३० वर्षांच्या गतीमंद महिलेवर धर्मांध रिक्शाचालकाने लैंगिक अत्याचार केला. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करत सीसीटीव्ही चित्रीकरण पाहून रिक्शाचालक फैझल खान याला अटक केली. आरोपीला कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

रिक्शाचालकाने गतीमंद महिलेच्या अपंगत्वाचा अपलाभ घेत तिला तिने सांगितलेल्या स्थळी न नेता मुंब्रा भागातील निर्जनस्थळी नेली. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पोलीस अन्वेषण करत आहेत.