मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून नवजात अर्भकांचा खर्च करणार !

पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ एप्रिल या दिवशी पुणे दौर्यावर आले असतांना दीनानाथ रुग्णालय प्रकरणातील तनिषा भिसे कुटुंबियांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. भविष्यात अशा घटना पुन्हा होवू नयेत; म्हणून ‘मानक प्रणाली’ (एस्.ओ.पी.) सिद्ध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीनंतर मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत एक्स खात्यावरून आणि त्यांच्या वैयक्तिक खात्यावरून या घटनेतील नवजात मुलींच्या उपचाराचा खर्च ‘मुख्यमंत्री साहाय्यता निधी’तून करणार असल्याचे त्यांनी सांगितले.