कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

खासगी डॉक्टर आणि कोविड सेंटर चालवणार्‍या स्पर्श हॉस्पिटलने रुग्णांच्या नातेवाइकांकडून १ लाख रुपये घेतल्याचा संतापजनक प्रकार !……गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ऑक्सिजन आणि खाटा यांचा तुटवडा : कोरोनाचा कहर चालू असूनही ‘व्हीआयपी’ संस्कृती कार्यरत…

चिमणगाव (जिल्हा सातारा) येथील रेशन दुकानामध्ये अवैधरित्या मद्यविक्री

कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे एका रेशन दुकानातच अवैधरित्या मद्यविक्री चालू होती. या ठिकाणी सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून संबंधिताना कह्यात घेतले असून ७ लाख रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन करण्यात आला आहे.

धुळे येथे कोरोनाग्रस्त मृत रुग्णाचे पैसे आणि दागिने रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी चोरले !

रुग्णांचे रक्षक असणारे आरोग्य कर्मचारी रुग्णांचे भक्षक बनत असतील आणि रुग्णालये त्यांना पाठीशी घालत असतील, तर ते गंभीर आहे ! अशाने रुग्णालयावरील जनतेचा विश्‍वास उडाला तर आश्‍चर्य वाटायला नको !

लोकप्रतिनिधी आणि त्यांचे नातेवाइक यांंमुळे वयोवृद्ध नागरिक लसीकरणासाठी घंटोन्घंटे रांगेतच !

नागरिक दिवस उगवला की, त्वरित लसीकरण केंद्र गाठत आहेत. घंटोन्घंटे रांगेत उभे राहिल्यानंतर लसीकरणासाठी क्रमांक येत आहे; मात्र त्यातही लोकप्रतिनिधी आणि त्यांने नातेवाईक हे मागील दाराने जाऊन नोंदणी करून लस टोचून घेत आहेत.

‘ऑनलाईन’ परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या खर्‍या गुणवत्तेचा विकास होईल का ?

‘या परीक्षा घेण्याच्या पद्धतींतील त्रुटींमुळे केवळ सोपस्कार म्हणून घेण्यात आल्या’, असे वाटले. ‘अशा परीक्षांतून विद्यार्थ्यांची खरी गुणवत्ता लक्षात येणे कठीण आहे आणि चांगली गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांची यामुळे हानीही होत आहे’, असे प्रकर्षाने जाणवले.

मीरा-भाईंदर शहरात रेमडेसिविरचा काळाबाजार करणार्‍या दोघांना अटक

मीरा-भाईंदर शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची माहिती मिळाल्यावर बोगस ग्राहक पाठवले असता १६ सहस्र रुपयांना इंजेक्शनची विक्री होत असल्याचे आढळले.

ठाण्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे दोघेजण अटकेत

रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा ठाणे खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून पकडला. या प्रकरणी पोलिसांनी येथील तीनहात नाका आणि बाळकुम नाका परिसरातून अतिफ अजुम अन् प्रमोद ठाकूर यांना अटक केली.

एका राज्यातील एका मोठ्या रुग्णालयात एका साधिकेने अनुभवलेली विदारक स्थिती

आरोग्यकेंद्रांची स्थिती अत्यंत विदारक झालेली आहे. एका साधिकेने एका मोठ्या रुग्णालयात अनुभवलेली अशी विदारक स्थिती येथे देत आहोत.

देवस्थाने सरकारी कचाट्यातून मुक्त होईपर्यंत हिंदू संपूर्णपणे स्वतंत्र नाहीत ! – अधिवक्ता किरण बेट्टदापूर, कर्नाटक उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय

कर्नाटकमधील एकट्या कोल्लूर मूकम्बिका देवस्थानात २२ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, तर इतर ४ लाख देवस्थानांत किती रुपयांचा घोटाळा झाला असेल ?, याचा विचार करता येणार नाही.

शासनाच्या वतीने बालकांना देण्यात येणार्‍या लसी सुरक्षित ठेवणार्‍या शीतकरण यंत्रणेत (‘कोल्ड चेन’मध्ये) आढळून येणार्‍या त्रुटी

लसीकरण केंद्रांमधील शीतकरण यंत्रणा काही वेळा निर्धारित मापदंडानुसार कार्यरत नसणे, ज्यामुळे लसीच्या परिणामकारकतेवर विपरित परिणाम होऊन ती बालकांच्या आरोग्यासाठी धोकादायक होऊ शकणे.