नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठातील ‘ऑनलाईन’ परीक्षेत अपप्रकारांचे धडे !

विद्यापिठाने ‘ऑनलाईन’ परीक्षा पूर्णपणे पारदर्शी पद्धतीने होत असल्याचा दावा केला आहे; मात्र ‘यू ट्यूब आणि इतर सामाजिक माध्यमे’ यांच्यावर ‘ऑनलाईन’ परीक्षेत अपप्रकार कसे करायचे ?’ याचे धडे देणार्‍या अनेक ध्वनीचित्रचकत्या आहेत.

ठाणे येथे १५ जणांनी अवैधरित्या लस घेतली !

अभिनेत्री मीरा चोप्रा हिचे बनावट ओळखपत्र सिद्ध करून तिला अवैधरित्या लस दिल्याचे उघड झाले होते. समितीच्या अन्वेषणातून अशा प्रकारे २१ श्रीमंत तरुण-तरुणींची बनावट ओळखपत्र सिद्ध केली होती. यापैकी १५ जणांनी ‘फ्रँटलाईन’ कामगार म्हणून अशा प्रकारे लस घेतल्याची समोर आले.

बेंगळुरूमध्ये रेमडेसिविरच्या रिकाम्या कुपीमध्ये ग्लुकोज भरून विक्री करणार्‍या एका डॉक्टरसह वॉर्डबॉयला अटक

शहरात नकली रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करणारे खासगी रुग्णालयाचे डॉ. सागर आणि वॉर्डबॉय कृष्णा यांना पोलिसांनी अटक केली आहे. अर्धेच इंजेक्शन रुग्णांसाठी वापरून उरलेले काळ्या बाजारात विकत होते.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात भरती केल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना आलेले कटू अनुभव येथे देत आहोत.

कोरोनाबाधित मृताला खांदा देण्यासाठी २ सहस्र रुपये, तर नातेवाइकांना मुखदर्शन करण्यासाठी उकळले जातात १ सहस्र रुपये !

यावरून देशात भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे, हेच स्पष्ट होते ! मृताच्या टाळूवरील लोणी खाणार्‍या इतक्या असंवेदनशील लोकांना ‘माणूस’ तरी म्हणता येईल का ?

बोगस बियाणांची समस्या मुळापासून सोडवा !

प्रतिवर्षी अस्मानी संकटामुळे पिके नेस्तनाबूत होतात. यामुळे त्रस्त असलेल्या शेतकर्‍यांचा अपलाभ घेऊन त्यांना लाखो रुपयांचे बनावट बियाणे विकले जाते. खरीप हंगामाला आरंभ होण्यापूर्वीच अशा घटनांनी शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा बनावट बियाणांमुळे शेतकर्‍यांची प्रचंड हानी होते.

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

खासगी डॉक्टर आणि कोविड सेंटर चालवणार्‍या स्पर्श हॉस्पिटलने रुग्णांच्या नातेवाइकांकडून १ लाख रुपये घेतल्याचा संतापजनक प्रकार !……गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ऑक्सिजन आणि खाटा यांचा तुटवडा : कोरोनाचा कहर चालू असूनही ‘व्हीआयपी’ संस्कृती कार्यरत…

चिमणगाव (जिल्हा सातारा) येथील रेशन दुकानामध्ये अवैधरित्या मद्यविक्री

कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे एका रेशन दुकानातच अवैधरित्या मद्यविक्री चालू होती. या ठिकाणी सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून संबंधिताना कह्यात घेतले असून ७ लाख रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन करण्यात आला आहे.

धुळे येथे कोरोनाग्रस्त मृत रुग्णाचे पैसे आणि दागिने रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी चोरले !

रुग्णांचे रक्षक असणारे आरोग्य कर्मचारी रुग्णांचे भक्षक बनत असतील आणि रुग्णालये त्यांना पाठीशी घालत असतील, तर ते गंभीर आहे ! अशाने रुग्णालयावरील जनतेचा विश्‍वास उडाला तर आश्‍चर्य वाटायला नको !

लोकप्रतिनिधी आणि त्यांचे नातेवाइक यांंमुळे वयोवृद्ध नागरिक लसीकरणासाठी घंटोन्घंटे रांगेतच !

नागरिक दिवस उगवला की, त्वरित लसीकरण केंद्र गाठत आहेत. घंटोन्घंटे रांगेत उभे राहिल्यानंतर लसीकरणासाठी क्रमांक येत आहे; मात्र त्यातही लोकप्रतिनिधी आणि त्यांने नातेवाईक हे मागील दाराने जाऊन नोंदणी करून लस टोचून घेत आहेत.