भारतातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयात उघडपणे चालणारी लूट !

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढे स्वतः भरलेले भरमसाठ देणगीमूल्य वसूल करण्यासाठी रुग्णांची लूट करतात.

पर्यटनस्थळे आणि रस्त्यांवर हुल्लडबाजी करणार्‍यांवर कारवाई होणार ! – पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

३१ डिसेंबरच्या रात्री जिल्ह्यात मद्यालये रात्री १ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची अनुमती दिली असल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यावर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मद्यप्राशन करून वाहने चालवणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे.

विधीमंडळ परिसरात प्रथमच शाईपेनच्या वापरावर बंदी ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईने आक्रमण झाल्यानंतर राज्यभरात नेत्यांच्या बंदोबस्ताच्या वेळी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

रुग्णालयातील औषधी दुकानांतून औषधे खरेदी करण्याची सक्ती नियमबाह्य !

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी नुकताच आदेश काढून औषध खरेदी करण्यासाठी रुग्णालय सक्ती करू शकत नाही, असा निर्वाळा दिला आहे.

‘लिव्ह इन रिलेशनशिप’च्या विघातक विचारांना नाकारणे हे राष्ट्रीय कर्तव्य !

वेदांच्या शिकवणीकडे दुर्लक्ष करून या संकल्पनेचा स्वीकार केल्यास आपली कुटुंबसंस्था उद्ध्वस्त होईल. त्याचा परिणाम राष्ट्र उद्ध्वस्त होण्यात होईल. म्हणून विवाह किंवा कुटुंब संस्था आपण सुरक्षित राखली पाहिजे आणि हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.

गुजरात : राज्यातून २९० कोटी रुपयांची रोकड, ५०० कोटींचे अमली पदार्थ आणि ४ लाख लिटर दारु जप्त !

‘निवडणुकीत पैसे देऊन मते विकत घेतली जातात’, असे सर्वसामान्य नागरिकांना ठाऊक झाले असल्याने २९० कोटी रुपयांची रोकडे सापडणे, हे आश्‍चर्यकारक म्हणता येणार नाही.

ऑक्टोबर मासात खासगी बसगाड्यांकडून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने १ लाख ८६ सहस्र रुपयांचा दंड वसूल केला !

दीपावलीच्या कालावधीत खासगी बसगाड्यांकडून भाडेवाढीच्या निमित्ताने जी लूट होते, त्याची तक्रार नोंदवण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एक क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला होता. या क्रमांकावर ‘शून्य’ तक्रारी नोंद झाल्या, असे कार्यालयातील संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले.

पुणे येथे गायी-म्हशींच्या दूधवाढीसाठी औषधांचा अवैध वापर करणार्‍या पश्चिम बंगालमधील टोळीला अटक !

प्रत्येक क्षेत्रामध्ये गुन्हेगारीत पुढे असलेले मुसलमान !

अर्भकाला बेवारस सोडण्याची ५ वर्षांत ११ प्रकरणे, तर चालू वर्षी ४ प्रकरणे नोंद ! –  बाल हक्क संरक्षण आयोग, गोवा

असले प्रकार कायद्याने नाही, तर प्रत्येकाला नीतीमत्ता शिकवूनच रोखता येतात. कर्मफलन्याय, संचित, प्रारब्ध, ईश्वराचा न्याय आदी गोष्टी ठाऊक नसल्यानेच समाज स्वैर वागत आहे. समाजातील प्रत्येकालाच साधना शिकवणे आवश्यक बनले आहे !

चर्चमधील कुकृत्ये !

हिंदु धर्माला ‘धर्मद्वेषा’च्या चष्म्यातून पहाणारे ख्रिस्ती धर्मातील अपप्रकारांविषयी काहीच का बोलत नाहीत ? यातूनच त्यांचा ख्रिस्तीधार्जिणेपणा उघड होतो, हेच खरे ! हिंदु पुजार्‍यांच्या संदर्भात प्रत्येक स्तरावर विरोधात्मक भूमिका घेतली जाते; पण पाद्रयांची कोणतीही कृती ही समर्थनीय ठरवली जाते. ही धर्मद्वेषी मानसिकताच अशा घटनांचे मूळ आहे !