दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप :माजी कुलगुरूंना मारहाण करणार्‍यांवर गुन्‍हा नोंद; निकृष्‍ट जेवण देणार्‍या कंत्राटदारांना ५ लाख रुपये दंड होणार !…

मुंबई ते साईनगर शिर्डीदरम्‍यान धावणार्‍या ‘वंदे भारत’ रेल्‍वेगाड्यांमध्‍ये निकृष्‍ट दर्जाचे जेवण मिळत होते. रेल्‍वेने याची गंभीर नोंद घेतली असून दोषी कंत्राटदारांना ५ लाख रुपयांपर्यंत कमाल दंड होणार आहे. आतापर्यंत दंडाची रक्‍कम २५ सहस्र रुपये होती.

पिंपरी (पुणे) येथे प्रा. मोरे प्रेक्षागृहातील भाड्याच्‍या रकमेत अपहार !

पिंपरी (पुणे) महापालिकेचे प्रा. रामकृष्‍ण मोरे प्रेक्षागृहाचे भाडे, अनामत रक्‍कम आणि इतर शुल्‍कासाठी जमा झालेल्‍या रकमेत ७ लाख ६६ सहस्र २३६ रुपयांचा अपहार करण्‍यात आला आहे.

संवेदनाशून्‍य देहली !

देहलीकरांची संकुचित वृत्ती ‘आपणही समाजाचा एक अविभाज्‍य घटक आहोत, उद्या ही वेळ स्‍वतःवरही येऊ शकते’, हे विसरला आहे !

निर्लज्‍ज नितीश !

विधानसभेत अश्‍लील हावभाव करून दायित्‍वशून्‍य विधाने करणारे मुख्‍यमंत्रीपदी असणे, ही लोकशाहीची शोकांतिका !

पुणे शहरातील १ सहस्र ८२६ पैकी केवळ २४५ होर्डिंग्‍जचे नूतनीकरण !

विज्ञापनांमुळे कोट्यवधी रुपयांचा लाभ कमावणारी आस्‍थापने सर्व नियम धाब्‍यावर बसवतात, हे लज्‍जास्‍पद ! नियमांचे पालन न करणार्‍या आस्‍थापनांवर कठोर कारवाई करा !

सिंधुदुर्ग : नरकासुर प्रतिमा स्पर्धेवर बंदी घालण्याची वेंगुर्ला येथील नागरिकांची मागणी

भगवान श्रीकृष्णाच्या ऐवजी नरकासुररूपी दैत्यालाच देव करणार्‍या आणि प्रतिवर्षी वाढत चाललेल्या ‘नरकासुर प्रतिमा स्पर्धा’ या विकृतीला आमचा विरोध आहे. या ‘विकृत आणि विद्रूप’ स्पर्धेवर बंदी घालावी आणि संस्कृती अन् तरुण पिढी यांना वाचवावे.

अपघातग्रस्त तरुणाला कुणीच साहाय्य न केल्याने त्याचा मृत्यू !

भारतियांमध्ये नैतिकता शिल्लक राहिली नसल्यानेच अशा घटना आता घडू लागल्या आहेत. शासनकर्त्यांनी जनतेला नैतिकता न शिकवल्याचा हा परिणाम आहे ! पोलिसांनी साहाय्य करणार्‍यालाच गुन्हेगार समजण्याची मानसिकता पालटली, तर जनता साहाय्यासाठी पुढे येईल, हेही तितकेच सत्य आहे !

रेल्वेची विनातिकीट प्रवाशांवर कारवाई !

विनातिकीट प्रवास करणार्‍या ४ सहस्र ४३८ प्रवाशांवर १६ ऑक्टोबर या दिवशी मध्य रेल्वेने कारवाई केली. त्यांच्याकडून १६ लाख ८५ सहस्र रुपये दंड वसूल केला आहे.

गरब्याची चित्रे उघड्या पाठीवर नकोत !

युवती त्यांच्या पाठीवर देवीचे छायाचित्र, गरबा खेळतांनाचे छायाचित्र रंगवून घेत आहेत. हा व्यवसाय करणारे रंगवणारे बहुतांश मुसलमान आहेत. धर्मांध हिंदु धर्मातील प्रथा परंपरांतूनच धर्माची आणि हिंदूंची किती हानी करत आहेत, हे हिंदु युवती कधी समजून घेणार ?

सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या महिला डॉक्टरला अटक !

उमरखेड येथे एका शाळेत इयत्ता ५ वीत शिकणार्‍या मुलीला दुचाकीवर शाळेत सोडण्याच्या निमित्ताने बाहेर नेऊन गुन्हेगाराने तिच्यावर अत्याचार केला. मुंबईतील डॉ. सायली शिंदे यांना पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून अटक केली.