(रँगिंग म्हणजे नवीन विद्यार्थ्यांचा शारीरिक किंवा मानसिक स्तरावर केला जाणारा छळ)
ठाणे, ५ ऑक्टोबर (वार्ता.) – ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील राजीव गांधी महाविद्यालयात प्रथम आणि द्वितीय वर्षात शिकणार्या ९ विद्यार्थ्यांनी एम्.बी.बी.एस्.ला (आरोग्य विज्ञान शाखेची पदवी) नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे माजिवाडा येथील वसतीगृहात रॅगिंग केले. रॅगिंग प्रतिबंधक समितीच्या चौकशीतून हे उघड झाले. या प्रकरणी संबंधित ९ विद्यार्थ्यांना वसतीगृहातून कायमस्वरूपी काढून टाकण्यात आले आहे, तसेच एका शैक्षणिक सत्रासाठी त्यांचे महाविद्यालयातूनही निलंबन करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाविद्यार्थ्यांची छळवणूक करणार्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातूनच काढून टाकायला हवे ! तसे केल्यासच रॅगिंगसारख्या प्रकारांना आळा बसेल ! |