कोन (पनवेल) येथील ‘इंडिया बुल्स’ महागृहनिर्माण प्रकल्पातील गैरकारभार !
पनवेल – तालुक्यातील कोन गावालगत ‘इंडिया बुल्स’ या इमारतीचे बांधकाम करणार्या आस्थापनाच्या महागृहनिर्माण प्रकल्पातील रहिवाशांनी ८ ऑक्टोबर या दिवशी पिण्याचे पाणी अपुरे मिळत असल्याने इमारतीच्या आवारात आंदोलन केले. येथे दिवसाला ५० हून अधिक टँकर पाणी खरेदी करावे लागत आहे. विकासकाने आश्वासन देऊनही त्याचे पालन न केल्यामुळे क्लब हाऊस, तरणतलाव यांसारख्या इतर सुविधा न दिल्याचा आरोप रहिवाशांनी केला. इमारतीच्या आवाराची देखभाल करणार्या अधिकार्यांनी हे सर्व आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
१. ‘इंडिया बुल्स’चा महागृहनिर्माण प्रकल्प असून यामध्ये ३ सहस्र २०० सदनिका आहेत. ३२ मजल्यांच्या १७ इमारतींमध्ये हे रहिवाशी रहातात.
२. पिण्याचे पाणी अल्प येत असल्याने आणि ‘इंडिया बुल्स’ आस्थापनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने रहिवाशांनी सोसायटीला पिण्याचे पाणी किती मिळते, याची माहिती माहितीच्या अधिकारामध्ये काढली.
३. यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने एका आस्थापनाला पिण्याच्या पाण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात नळजोडणी दिली; परंतु तिच्या नोंदणीविषयी रहिवाशांना काहीच ठाऊक नाही, तसेच संबंधित नळजोडणी ही म्हाडा प्रकल्पातील घरे बांधण्यासाठी घेतली असून भविष्यात ही पाणी सुविधा बंद झाल्यास रहिवाशांनी काय करावे ? याची त्यांना चिंता आहे.
संपादकीय भूमिका
|