पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या परीक्षा विभागाच्या घेतला जाणारा एम्.बी.ए.च्या ‘लीगल आपेक्ट ऑफ बिझनेस’ या विषयाचा पेपर फुटला. चिखली येथील डी.वाय. पाटील महाविद्यालयातून प्रश्नपत्रिका फुटल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे विद्यापिठाने ही परीक्षा रहित केली आहे. चौकशीनंतर दोषींवर कारवाई केली जाणार आहे, असे विद्यापिठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले. परीक्षा २६ डिसेंबर या दिवशी सकाळी १० ते १२.३० या वेळेत घेतली जाणार आहे.
संपादकीय भूमिकामहत्त्वाच्या विषयांच्या प्रश्नपत्रिका कशा काय फुटतात ? यामुळे विद्यार्थ्यांना झालेला मनस्ताप आणि गेलेल्या वेळ कसा भरून निघणार ? |