Prayagraj Mahakumbh 2025 : महाकुंभपर्वातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश ! – योगी आदित्यनाथ

प्रयागराज कुंभपर्व २०२५

प्रयागराज : महाकुंभमेळ्याच्या समाप्तीच्या निमित्ताने उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, प्रयागराज येथे अद्यापही प्रचंड गर्दी आहे. १३ जानेवारीपासून महाशिवरात्रीच्या दिवशी महाकुंभपर्व संपेपर्यंत ६६ कोटी भाविकांनी गंगा, यमुना आणि सरस्वती त्रिवेणीमध्ये स्नान केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविकांनी प्रयागराजमधील स्नानाद्वारे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.

प्रयागराजमध्ये आलेल्या प्रत्येक भाविकाची ‘वसुधैव कुटुम्बकम्’ची भावना होती. या सर्व भाविकांचे हृदयातून अभिनंदन करतो. महादेव ही कल्याणाची देवता आहे. त्यांच्या कृपादृष्टीने सर्व व्यवस्था चालते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने उत्तरप्रदेशातील सर्व शिवालयांमध्ये भाविकांची मोठी गर्दी आहे. काशीमध्ये नियमित ८-१० लाख भाविक बाबा विश्‍वनाथाच्या दर्शनाला येत आहेत. अयोध्येतही प्रभु रामलल्लाच्या दर्शनासाठी नियमित ८-१० लाख भाविक येत आहेत. या सर्व भाविकांच्या श्रद्धेला मी नमन करतो !