१ फेब्रुवारीपासून रिक्शा-टॅक्सीच्या दरातही ३ रुपयांची वाढ होणार !
मुंबई – राज्य परिवहन महामंडळ अर्थात् एस्.टी. बसगाड्यांच्या तिकीट दरात १४.९७ टक्के वाढ करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे. ही दरवाढ २४ जानेवारीपासून लागू झाल्याची माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. बससह रिक्शा आणि टॅक्सी यांच्या भाडेवाढीलाही मान्यता देण्यात आली असून दोन्ही वाहनांच्या दरात ३ रुपयांची वाढ होणार आहे. ती भाडेवाढ १ फेब्रुवारीपासून लागू होईल. राज्य परिवहन प्राधिकरणाची बैठक मंत्रालयात पार पडली. त्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. भाडेवाढीमुळे रिक्शाचे किमान भाडे २३ रुपयांहून २६ रुपये इतके होणार असून टॅक्सीचे किमान भाडे २८ रुपयांहून ३१ रुपये इतके होणार आहे.