कोल्हापूर – राज्य परिवहन महामंडळाने एस्.टी. बसच्या तिकिटात १४.९७ टक्के वाढ केली असून आता प्रवाशांना वाढीव दरानुसार तिकीट द्यावे लागणार आहे. कोल्हापूर-सांगली या प्रवासासाठी जिथे प्रवाशांना पूर्वी ७० रुपये द्यावे लागत होते, आता ८१ रुपये द्यावे लागणार आहेत. अन्य काही गावांचे वाढीव दर पुढीलप्रमाणे आहेत. (कंसात जुना दर दिलेला आहे.)
कोल्हापूर-पंढरपूर ३०३ रुपये (२६० रुपये), कोल्हापूर-सोलापूर ४३३ रुपये (३७५ रुपये), कोल्हापूर-इचलकरंजी ४६ रुपये (४० रुपये), कोल्हापूर-गडहिंग्लज १०२ रुपये (९० रुपये), कोल्हापूर-पुणे ३८३ रुपये (३३०) रुपये साधी गाडी, कोल्हापूर-मुंबई ६५४ रुपये (५६५ रुपये), शिवशाहीचे दर कोल्हापूर-पुणे ५६६ (४९५ रुपये), कोल्हापूर-छत्रपती संभाजीनगर १ सहस्र १७६ रुपये (१ सहस्र २५ रुपये) असे असणार आहेत.