राज्य परिवहन मंडळाची भाडेवाढ चालू

मुंबई – राज्य परिवहन गाड्यांची भाडेवाढ होणार असल्याचे परिवहनमंत्री भरतशेठ गोगावले यांनी घोषित केले आहे; मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही भाडेवाढ झाल्याचे नाकारल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘आम्हाला नवीन बसगाड्या घेऊन शहर आणि ग्रामीण भागात द्यायच्या आहेत. सेवाही दिली जाईल आणि संस्थाही नीट चालेल’, असे पाहिले जाईल’, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
चांगली सुविधा आणि कर्मचार्यांचे वेतन यांसाठी भाडेवाढ क्रमप्राप्त आहे. राज्य परिवहन मंडळ मोठ्या प्रमाणात तोट्यात आहे. गेली ३ वर्षे भाडेवाढ करण्यात आलेली नाही, असे परिवहनमंत्र्यांनी म्हटले आहे.
वरील प्रकरणी विरोधी मते व्यक्त होत असल्याने ‘सरकारमध्ये गोंधळाची स्थिती आहे’, अशी टीका या प्रकरणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. भाडेवाढीमुळे सुट्या पैशांची अडचण येत असल्याने कोल्हापूर येथे भाडेवाढीच्या संदर्भात प्रवासी संतप्त आहेत, तर कोकणात सामान्य प्रवासी अप्रसन्न आहेत.