विविध प्रकारची धान्ये, कडधान्ये आणि डाळी यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांच्या संदर्भातील संशोधन !

‘आपण दैनंदिन आहारात विविध प्रकारची धान्ये, उदा. ज्वारी, बाजरी इत्यादी; कडधान्ये, उदा. मटकी, चवळी इत्यादी आणि डाळी, उदा. तुरडाळ, मूगडाळ इत्यादी यांचा उपयोग करतो. काही दाक्षिणात्य पदार्थ, उदा. इडली-डोसा यांमध्ये उडीदडाळीचा उपयोग केला जातो. काही गोड पदार्थ, उदा. पुरणपोळी इत्यादी मध्ये चणाडाळीचा उपयोग केला जातो. कोणत्या ऋतूत कोणता आहार आणि तो किती प्रमाणात घ्यावा ?, याविषयी आहारतज्ञ मार्गदर्शन करतात. तसेच कोणत्या ऋतूत कोणता आहार टाळावा हेही सांगतात. वैद्यमंडळी रुग्णांना असलेल्या व्याधींनुसार (कफ, वात आणि पित्त हे त्रिदोष वाढल्याने निर्माण होणार्‍या विविध प्रकारच्या व्याधींनुसार) त्यांनी कोणता आहार घ्यावा आणि कोणता टाळावा ? याविषयी मार्गदर्शन करतात.

विविध प्रकारची धान्ये, कडधान्ये आणि डाळी यांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने काही संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांसाठी लोलकाचा उपयोग करण्यात आला. लोलकाने वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील सकारात्मक अन् नकारात्मक ऊर्जा मोजता येतात. हे संशोधन पुढे दिले आहे.

महर्षी

१. विविध प्रकारची धान्ये, कडधान्ये आणि डाळी यांच्या नोंदी 

लोलक

या प्रयोगात काही निवडक धान्ये, कडधान्ये आणि डाळी यांच्या लोलकाने चाचण्या करण्यात आल्या. त्यांच्या नोंदी पुढे दिल्या आहेत.


वरील नोंदींवरून पुढील सूत्रे लक्षात येतात.

सौ. मधुरा कर्वे

अ. बाजरी आणि ज्वारी या दोन्ही धान्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. बाजरीपेक्षा ज्वारीमध्ये सकारात्मक ऊर्जा अधिक आहे.

आ. अख्ख्या मसुरात नकारात्मक आणि सकारात्मक या दोन्ही ऊर्जा आहेत. मटकी आणि चवळी या कडधान्यांत नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. अख्खा मसूर आणि मटकीपेक्षा चवळीत सकारात्मक ऊर्जा अधिक आहे.

इ. मसूरडाळ आणि उडीदडाळ यांच्यामध्ये नकारात्मक आणि सकारात्मक या दोन्ही ऊर्जा आहेत. तुरडाळ, चणाडाळ आणि मूगडाळ यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. तुरडाळीत सर्वांत अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहे. मूगडाळीत सर्वाधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहे.

या संशोधनातून लक्षात येते की, विविध प्रकारची धान्ये, कडधान्ये आणि डाळी यांत सकारात्मक स्पंदने आहेत; पण त्यांचे प्रमाण निराळे आहे.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१२.२.२०२५)