दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : तिसर्‍या टप्प्याच्या निवडणुकीसाठी राज्यात ३१७ अर्ज वैध ; मुंबईत भाजपच्या प्रदेश कार्यालयाला आग !…

लोकसभेच्या तिसर्‍या टप्प्याच्या निवडणुकीसाठी लोकसभेच्या ११ मतदारसंघांत एकूण ३१७ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली.

लोकसभा निवडणुकांवर कृत्रिम बुद्धीमत्तेचा (‘एआय’चा) प्रभाव !

सध्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र मानवी कल्पनेच्या पुढे विस्तारत आहे. त्याच्या माध्यमातून सोशल मिडिया, म्हणजे समाजमाध्यमांवर सध्या धुमाकूळ चालू आहे. त्यातच भर म्हणून कि काय फेसबुक, एक्स, यू ट्यूब किंवा व्हॉट्सॲप यांच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धीमत्तेचा (म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स – ‘एआय’चा) वापर मुक्तपणे होत आहे.

भाजप वगळता अन्य पक्षांच्या घोषणापत्रांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेला स्थान नगण्य !

‘जे राजकीय पक्ष देशाला सुरक्षित ठेवू शकत नाहीत. त्यांच्या बाजूने मतदान करणे, हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे लोकांनी सर्व पक्षांच्या घोषणापत्रांचा अभ्यास करावा आणि त्यानंतर कुठल्या पक्षाला मतदान करायचे, हे ठरवावे.’

कोल्हापूर जिल्ह्यातील ३ सहस्र ८५१ शस्त्रे जमा करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश !

जामिनावर सोडलेल्या व्यक्ती, दंग्यांमधील व्यक्ती, तसेच अन्य यांच्याकडून राजकीय हितसंबंधातून त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशी सर्व शस्त्रे जमा करून घेणे अत्यावश्यक आहे.

‘गॅरेंटी’ (हमी) देण्यासाठी पुष्कळ धैर्य लागते ! – पंतप्रधान मोदी

आम्ही घराघरात वीज दिली, पाण्याची जोडणी दिली, ४ कोटी गरिबांना घरे दिली. ५० कोटींहून अधिक जण अधिकोषाला जोडले गेले. २५ कोटींहून अधिक लोकांना गरिबीतून बाहेर काढले.

नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी नाव मागे घेतले !

उमेदवारांच्या स्पर्धेतून नाव मागे घेतांना उमेदवारीला विलंब होत असल्यामुळे त्याचा परिणाम मतदानावर होऊ शकतो. त्यामुळे धोका टाळण्यासाठी स्वत:चे नाव मागे घेत असल्याचे भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

महाराष्ट्रात मतांसाठी मद्याचे प्रलोभन, आचारसंहितेच्या काळात ४ सहस्र २५५ गुन्हे नोंद !

मतदारांना मद्य आणि अमली पदार्थ यांचे आमीष दाखवणे अन् त्यातून उमेदवार निवडून येणे ही व्यवस्थेची थट्टा !

महाराष्ट्रातील ५ जागांवर मतदान !

पूर्व विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या ५ मतदारसंघात पहिल्या टप्प्यांतर्गत मतदान झाले. यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : नागपूर येथे मतदान केंद्रात निघाला साप !; तृतीय पंथियांसाठी वेगळे मतदान केंद्र…

तृतीय पंथियांसाठी विशेषत्वाने मतदान केंद्र निर्माण करण्यात आले होते. त्यांच्या ‘इंद्रधनुष थीम’ मतदान केंद्राला जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी भेट दिली.  

महाराष्ट्रात लोकसभेचे पहिल्या टप्प्याचे मतदान ५४.८५ टक्के !

लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात विदर्भात पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल या दिवशी पार पडले.