निवडणूक ओळखपत्राविना अन्य ओळख पुरावेही मतदानासाठी चालणार !

मुंबई – १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे या दिवशी महाराष्ट्राच्या विविध भागांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी मतदार सूचीत नाव असणे आवश्यक आहेच. मतदार ओळखपत्र नसल्यास अन्य १२ प्रकारचे ओळख पुरावे स्वीकारण्याची अनुमती निवडणूक आयोगाने दिली आहे.

पुढील ओळख पुरावे मतदानासाठी चालणार आहेत

१. मतदान कार्ड

२. पासपोर्ट

३. वाहन चालक परवाना

४. छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र

५. छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक

६. पॅनकार्ड

७. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीद्वारे दिलेले स्मार्टकार्ड

८. कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड

९. मनरेगा जॉबकार्ड

१०. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज

११. खासदार/आमदार/विधान परिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र

१२. आधारकार्ड