दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : समृद्धी महामार्गावर सिन्नर येथे अपघात; यमराजाची वेशभूषा करून निवडणुकीचा अर्ज भरला !…

समद्धी महामार्गावर १८ एप्रिलला सकाळी सिन्नर तालुक्यातील खंबाळे शिवारात महिंद्रा स्कॉर्पिओचा भीषण अपघात होऊन २ जण ठार, तर ३ जण गंभीर घायाळ झाले आहेत.

मंत्री राणे आज उमेदवारी अर्ज भरणार

मंत्री नारायण राणे १९ एप्रिल या दिवशी उमेदवारी अर्ज प्रविष्ट करणार आहेत. आता महायुतीचे नारायण राणे विरुद्ध ठाकरे गटाचे विनायक राऊत यांच्यात थेट लढत होणार आहे.  

पुणे येथे सौ. सुप्रिया सुळे, सौ. सुनेत्रा पवार, डॉ. अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज प्रविष्ट !

‘महायुती’कडून बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सौ. सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज प्रविष्ट केला.

Lok Sabha Voting : लोकसभेसाठी १९ एप्रिल या दिवशी पहिल्या टप्प्यातील मतदान !

पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल या दिवशी होत आहे. या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांमधील १०२ मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे.

श्रीमंत छत्रपती शाहू यांनी ३०० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे केले घोषित !

छत्रपती शाहू यांच्या विरोधात उभे असलेले शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्याकडे १४ कोटी ३७ लाख २८ सहस्र ३९८ रुपयांची संपत्ती आहे.

पुणे येथे निवडणूक प्रशिक्षणास अनुपस्थित रहाणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करणार ! – डॉ. सुहास दिवसे, जिल्हा निवडणूक अधिकारी

जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, “राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे आकाराने मोठा आहे. ४ लोकसभा मतदारसंघ आणि ८ सहस्र ३८२ मतदान केंद्रे आहेत. परिणामी निवडणुकीसाठी मोठी यंत्रणा उभी करावी लागत आहे.

महाराष्ट्रात मतदानाच्या आवाहनासाठी निवडणूक आयोग घेणार प्रसिद्ध व्यक्तींचे साहाय्य !

प्रसिद्ध व्यक्तींच्या आधाराने नव्हे, तर लोकप्रतिनिधींचे कार्य पाहून कधी मतदान होणार ?

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनाने काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचार कार्यास प्रारंभ !

लोकसभेच्या सोलापूर मतदारसंघाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर येथील नामदेव पायरीवर नारळ फोडत त्यांच्या प्रचार कार्यास प्रारंभ केला.

नाशिक लोकसभा लढवण्यावर श्री शांतिगिरी महाराज ठाम !

नाशिक लोकसभा मतदारसंघातून श्री शांतिगिरी महाराज यांनी निवडणूक लढवण्याची सिद्धता चालू केली आहे. यासाठी त्यांनी ८ दिवसांचे अनुष्ठान केले.

महाराष्ट्रात मतांसाठी पैसे, मद्य, अमली पदार्थ यांचा मोठ्या प्रमाणात वापर !

निवडणुकीच्या काळात घातलेल्या धाडींमध्ये नियमित सरासरी १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच घोषित केले आहे.