मुंबई – लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात विदर्भात पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल या दिवशी पार पडले. दुपारी ३ वाजेपर्यंत रामटेक येथे ५२.३८, नागपूर येथे ४७.९१, भंडारा-गोंदिया ५६.८७, गडचिरोरीली-चिमूर ६४.९५, तर चंद्रपूर येथे ५५.११ टक्के मतदान झाले. नागपूर येथे काही मतदारांची नावे मतदानसूचीत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. सद्य:स्थितीमध्ये नागपूर, गडचिरोली-चिमूर आणि भंडारा-गोंदिया या ३ मतदारसंघांत भाजपचे खासदार आहेत. रामटेकमध्ये शिवसेना, तर चंद्रपूर येथे काँग्रेसचे खासदार आहेत. गडचिरोली-चिमूर या नक्षलग्रस्त मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले, तर उर्वरित ४ लोकसभा मतदारसंघांत सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान झाले. राज्यात मतदानाच्या वेळी कोणतीही अनुचित घटनेची नोंद नाही.