नवी देहली – देशातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला २१ राज्यांतील १०२ जागांवर मतदान घेण्यात आले. यात सरासरी ६० टक्के मतदान झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
An average of 60% voter turnout in the first phase of the Loksabha Elections#LokSabhaElections2024 #VoteResponsibly pic.twitter.com/PF66L1i0sq
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 19, 2024
बंगालमध्ये सर्वाधिक ७७ टक्के, तर बिहारमध्ये केवळ ४६ टक्के मतदान झाले. महाराष्ट्रात ५५ टक्के मतदान झाले. बंगाल आणि मणीपूर येथे काही ठिकाणी हिंसाचार झाला. मणीपूरमध्ये गेल्या काही मासांपासूनच हिंसाचार चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर बिष्णुपूर जिल्ह्यातील थामनपोकपी येथील मतदान केंद्रावर गोळीबार झाला.