‘जोतिबा देवस्थान’ या न्यासाच्या भूमीची विक्री झाल्याची नोंद नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग १ आणि वर्ग २ यांच्याकडून अहवाल मागवले.

बाळूमामा भंडारा यात्रा सुरळीत होण्‍यासाठी शासकीय यंत्रणेने सहकार्य करावे ! – प्रांताधिकारी वसुंधरा बारवे

मुदाळतिट्टा (तालुका भुदरगड) येथील सद़्‍गुरु बाळूमामा यांच्‍या वार्षिक भंडारा यात्रा उत्‍सवास १२ मार्चपासून प्रारंभ होत आहे.

घरगुती गॅस सिलेंडरच्‍या झालेल्‍या दरवाढीच्‍या निषेधार्थ करवीर ठाकरे गटाची निदर्शने !

केंद्रात भाजप शासन आल्‍यापासून खाद्योपयोगी वस्‍तूंपासून अनेक वस्‍तूंचे भाव वाढत आहेत. त्‍यातच केंद्रातील भाजप सरकारने गॅस सिलेंडर आणि इंधन यांची दरवाढ केल्‍याने सर्वसामान्‍य जनता महागाईच्‍या आगीत होरपळत आहे.

‘आरोग्य भारती’ कोल्हापूरच्या वतीने कोथळी येथे आरोग्यविषयक मार्गदर्शन !

महिला जागृती सप्ताहाच्या निमित्ताने ‘आरोग्य भारती’ कोल्हापूर आणि हिमालया आस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने कोथळी येथे आरोग्य विषयक मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.

जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी सरकारी कर्मचार्‍यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !

राज्य सरकारने १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत असलेल्या कर्मचार्‍यांसाठी जुनी सेवानिवृत्त योजना बंद करून अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू केली. यामुळे कर्मचार्‍यांना अपेक्षित लाभ होत नाही. त्यामुळे परत जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी सरकारी कर्मचार्‍यांनी ४ मार्च या दिवशी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

‘श्री कोल्हापूर महालक्ष्मी महोत्सवास’ विरोध करणारे डावे, पुरोगामी यांचा फज्जा : महोत्सवास समाजातील सर्वच स्तरांतून मोठा प्रतिसाद !

हिंदुत्वनिष्ठांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात धार्मिक श्रद्धांचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलकांवर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करण्यात आली होती.

छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ ‘छत्रपती संभाजी महाराज बलीदान मास’ प्रत्येक हिंदूने पाळणे आवश्यक ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

‘छत्रपती संभाजी महाराज बलीदान मास’ प्रत्येक हिंदूने पाळणे आवश्यक आहे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले.

हिंदवी स्‍वराज्‍याचे शिलेदार ठरलेल्‍या गडदुर्गांची दु:स्‍थिती !

मुंबईच्‍या दक्षिण बाजूच्‍या टोकावर असलेल्‍या वांद्रेगडाची अर्ध्‍याहून अधिक तटबंदी ढासळली आहे. तटबंदीची वेळीच डागडुजी न झाल्‍यास गडाची सर्वच तटबंदी पडण्‍याची शक्‍यता आहे.

मुंबईत होणार्‍या ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’साठी कोल्‍हापूर जिल्‍ह्यातूनही विविध गड-दुर्गप्रेमी संघटना जाणार ! – किशोर घाटगे

मुंबईत होणार्‍या ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चासाठी कोल्‍हापूर जिल्‍ह्यातूनही विविध गड-दुर्गप्रेमी संघटना जाणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख श्री. किशोर घाटगे यांनी दिली.

१ लाख ७५ सहस्र रुपयांची लाच घेतांना शिरोळ नगर परिषदेच्‍या मुख्‍याधिकार्‍यांसह तिघांना अटक !

या संदर्भात अधिक माहिती अशी की, तक्रारदारांनी ८ सहस्र फूट भूमीवर बांधकामाची संमती घेण्‍यासाठी नगर परिषदेत आवेदन दिले होते. यानंतर सतत हेलपाटे घालूनही संमती मिळत नव्‍हती.