कोल्हापूर – राज्य सरकारने १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत असलेल्या कर्मचार्यांसाठी जुनी सेवानिवृत्त योजना बंद करून अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू केली. यामुळे कर्मचार्यांना अपेक्षित लाभ होत नाही. त्यामुळे परत जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी सरकारी कर्मचार्यांनी ४ मार्च या दिवशी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्च्यात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासह सरकारी कर्मचार्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. या वेळी कर्मचार्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. महाराष्ट्र सोडून उर्वरित ५ राज्यांना जर ही योजना चालू होणे शक्य आहे, तर महाराष्ट्राला ते का शक्य नाही ? असा प्रश्न या वेळी कर्मचार्यांनी उपस्थित केला.