शतक महोत्सवी ‘कोल्हापूर लाटकर पंचांग’ !

कोल्हापूर येथील प्रसिद्ध असलेले आणि धर्मपीठ मान्यताप्राप्त असलेले ‘कोल्हापूर लाटकर पंचांग’ गुढीपाडव्यास ११४ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. या निमित्ताने त्याचा प्रारंभ कसा झाला ? त्याची वैशिष्ट्ये, तसेच अन्य माहिती आमच्या वाचकांसाठी देत आहोत.

शिवराज नाईकवाडे यांच्याकडील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचा सचिवपदाचा कार्यभार काढला !

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडील सचिवपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढून घेतला आहे. सध्या हा कार्यभार राधानगरीचे प्रांताधिकारी सुशांत बनसोडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

मूर्तीवरील नित्योपचार तात्काळ चालू करा ! – देवीभक्त सकल हिंदु समाजाची मागणी

हिंदु धर्मशास्त्रानुसार मूर्तीमधील चैतन्य जागृत रहाण्यासाठी कोणत्याही देवतेवर स्नान-अभिषेक आदी नित्योपचार परंपरा चालू असणे अत्यावश्यक असते. ही परंपराच बंद असल्याने समस्त देवीभक्तांच्या श्रद्धांचे हनन होत आहे.

‘मार्वलस इंजिनिअर्स प्रा. लि.’ यांच्‍या वतीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्‍णालयास ‘ई-रुग्‍णवाहिका’ प्रदान !

या प्रसंगी ‘इनरव्‍हिल क्‍लब’च्‍या अध्‍यक्षा महानंदा चंदरगी, छत्रपती प्रमिलाराजे रुग्‍णालयाचे अधिष्‍ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, ‘मार्वलस इंजिनिअर्स प्रा. लि.’चे संग्राम पाटील, गौरव पाटील, डॉ. लोकरे, विद्या पठाडे, पल्लवी मूग, तसेच अन्‍य उपस्‍थित होते.

कसबा (संगमेश्वर) येथील श्री कर्णेश्वर मंदिरात नयनरम्य किरणोत्सव !

तालुक्यातील कसबा येथील श्री कर्णेश्वर मंदिराच्या गाभार्‍यातील शिवपिंडीवर १४ मार्च या दिवशी सकाळी ७ वाजता सूर्यकिरण आल्यामुळे भक्तगणांना किरणोत्सवाचा आनंद लुटता आला. गाभार्‍यात सर्वत्र पसरलेला सूर्यदेवाच्या सोनेरी प्रकाशाचा नयनरम्य सोहळा पहाण्यासाठी भक्तगणांनी गर्दी केली होती.

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्‍यावर पुढील २ आठवडे कारवाई करण्‍यास स्‍थगिती !

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्‍च न्‍यायालयाने २ आठवडे सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडीने) त्‍यांना अटक अथवा अन्‍य कोणतीही कारवाई न करण्‍याचे निर्देश दिले आहेत.

दत्त इंडिया साखर कारखान्‍यासह महापालिकेवर गुन्‍हा नोंद करणार !- जगन्‍नाथ साळुंखे, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

सांगलीत कृष्‍णा नदीत लाखो मासे मृत्‍यूमुखी पडल्‍याच्‍या प्रकरणी सांगलीतील दत्त इंडिया साखर कारखाना, स्‍वप्‍नपूर्ती डिस्‍टीलरी, तसेच सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका यांच्‍यावर फौजदारी गुन्‍हा नोंद करण्‍याची प्रक्रिया चालू करण्‍यात आली आहे.

‘ईडी’च्‍या कारवाईच्‍या विरोधात राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांची मुंबई उच्‍च न्‍यायालयात याचिका !

सक्‍तवसुली संचालनालयाने (‘ईडी’ने) राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांना १३ मार्चला मुंबईत उपस्‍थित रहाण्‍याविषयी नोटीस बजावली होती; मात्र हसन मुश्रीफ यांनी ‘ईडी’समोर स्‍वत: उपस्‍थित न रहाता त्‍यांचे अधिवक्‍ता प्रशांत पाटील यांच्‍या वतीने मुंबई उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट केली आहे.

कोल्हापूर शहरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील दोघांना ८ लाख रुपयांची लाच घेतांना अटक !

भ्रष्टाचारग्रस्त पोलीस प्रशासन हे जनतेसाठी घातकच ! अशा पोलिसांना कठोर शिक्षाच हवी !

धर्मवीर संभाजी महाराज समस्त हिंदुजनांचे दैवत ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

छत्रपती संभाजी महाराज यांनी सर्व सुखांचा त्याग करून निरंतर ९ वर्षे स्वराज्याच्या रक्षणासाठी संघर्ष केला. छत्रपती संभाजी महाराज हे शूर, पराक्रमी तर होतेच, तसेच रयतेच्या हिताला प्राधान्य देणारे आदर्श अधिपती होते.