मराठी पत्रकारितेत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा बाणेदारपणा जोपासण्याचे सामर्थ्य ! – मुख्यमंत्री ठाकरे

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ‘‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी स्वत:च्या विद्वत्तेच्या बळावर परकीय राजवटीत मराठी पत्रकारितेचा पाया घातला. स्वत:च्या लेखनातून ब्रिटिशांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचा बाणेदारपणा दाखवला.

पत्रकारांनी सामाजिक पत्रकारितेचा वसा जोपासावा ! – डॉ. संभाजी खराट, उपसंचालक, माहिती कार्यालय, कोल्हापूर विभाग 

चांगल्या समाज निर्मितीमध्ये पत्रकारांचा वाटा मोठा आहे. समाज आणि पत्रकार यांचे नाते घट्ट व्हावे यांसाठी पत्रकारांनी आता दुर्लक्षित घटकांना पुढे आणण्यासाठी लिखाण करावे.

‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे विविधांगी कार्य !

नोकरीसाठी केलेला किरकोळ अर्ज स्कॉटलंडच्या विश्वविद्यालयातील संग्रहालयात ठेवण्यात यावा, एवढे प्रभावीपणे सूत्रे मांडणार्‍या एका मराठी बुद्धीवंताचा थोडक्यात परिचय येथे देत आहोत.

व्हॉट्सअ‍ॅपवरून ‘ई-पेपर’ प्रसारित करणार्‍या गटांवर बंदी घालण्याचा देहली उच्च न्यायालयाचा आदेश

वाचकांना वर्गणीदार झाल्यानंतर ई-वर्तमानपत्रे उपलब्ध करून दिली जातात. या पद्धतीने दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करावी लागते. वर्तमानपत्रांचा खप वाढण्यासाठी देखील ही गोष्ट महत्त्वाची ठरते !

राष्ट्रीय पत्रकार संघाकडून ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी आणि वीणाताई गावडे ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित !

‘एन्युजे’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात पार पडलेल्या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

…चौथा स्तंभ डळमळला !

भारताला आतापर्यंत लाभलेला पत्रकारितेचा वारसा इतिहासजमा होता कामा नये. सरन्यायाधिशांच्या विधानातून सर्वच वर्तमानपत्रे, प्रसिद्धीमाध्यमे आणि पत्रकार यांनी वेळीच शहाणे होऊन शोध पत्रकारितेचा पुनश्च हरिओम् करायला हवा !

(म्हणे) ‘हेलिकॉप्टरच्या अपघातामागे भारतीय सैन्याचा बेशिस्तपणा उत्तरदायी !’

असे खोटे आरोप करून भारतीय सैन्य आणि भारतीय नागरिक यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा चीनचा हा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, हे त्याने लक्षात ठेवावे !

जनरल रावत यांच्या मृत्यूविषयी सामाजिक माध्यमांवरून आनंद व्यक्त !

भारताच्या राष्ट्रप्रेमी सेनापतीच्या मृत्यूविषयी अशा प्रकारचा विद्वेष पसरवणार्‍यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाखाली खटला चालवून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !

भिवंडी येथील संपादक किशोर पाटील पत्रकार क्षेत्रातील मानद ‘डॉक्टरेट’ पदवीने सन्मानित !

कोविडकाळात पत्रकारांना सहकार्य करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणारे पत्रकार किशोर पाटील यांना मानद ‘डॉक्टरेट’ मिळवण्याचा पहिला मान मिळाला.

धन आणि सुखसोयी यांसाठी हपापलेले भ्रष्टाचारी पत्रकार !

‘देशातील जनतेला चुकीची दिशा दिल्याने होणार्‍या हानीमुळे हे पत्रकार समष्टी पापाचे धनी होत आहेत’, हे त्यांना कळले, तरी ‘त्यांना ‘हिंदु धर्म’ कळला’, असे म्हणू शकतो; अन्यथा नावाचे ‘हिंदुत्ववादी’ आणि कर्माने ‘अधर्मी’ ठरले, तर ते पापाचे धनी होणार हे निश्‍चित !’