तासगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारदिनाच्या निमित्ताने आरोग्य पडताळणी शिबिर !

पत्रकार संघाच्या ‘हृदयरोगउपचार रुग्णवाहिका’ लोकार्पण प्रसंगी उपस्थित पत्रकार आणि मान्यवर

तासगाव (जिल्हा सांगली), ८ जानेवारी (वार्ता.) – आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजेच पत्रकारदिनाच्या निमित्ताने तासगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील पत्रकार आणि त्यांचे कुटुंबीय यांसाठी आरोग्य पडताळणी शिबिर घेण्यात आले. या प्रसंगी पत्रकार संघाच्या वतीने ‘हृदरोगउपचार रुग्णवाहिका’ लोकार्पण करण्यात आली.

या शिबिरात डॉ. शरद सावंत, डॉ. शिवाजी पाटील, डॉ. प्रवीण शिंदे, डॉ. आदिती पटवर्धन, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. अतुल पाटील, डॉ. सयाजी झांबरे यांच्यासह तज्ञांनी वैद्यकीय सेवा केली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष विष्णु जमदाडे, संजय माळी, ज्येष्ठ पत्रकार राजाराम माळी, दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. प्रशांत चव्हाण आणि श्री. गजानन खेराडकर उपस्थित होते.