‘जे.के.डी.एफ्.पी’ या राजकीय संघटनेवर लादण्यात आली ५ वर्षांची बंदी !

ही संघटना वर्ष १९९८ पासून देशविरोधी कारवायांमध्ये गुंतली होती. या संघटनेने भारतातील फुटीरतावाद आणि आतंकवाद यांना प्रोत्साहन दिले आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.

(म्हणे) ‘आतंकवाद आणि अपहरण यांच्या धोक्यामुळे जम्मू-काश्मीर, मणीपूर आणि आसाम येथे जाऊ नका !’

कॅनडाच्या आगळिकीप्रकरणी त्याला धडा शिकवण्यासाठी भारताने स्वत:च्या वाढलेल्या शक्तीचा उपयोग करावा !

(म्हणे) ‘आम्ही काश्मीरचे सूत्र जगाच्या प्रत्येक मंचावर उपस्थित करत रहाणारच !’-पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर अल हक काकड

काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे जगालाही ठाऊक असल्याने पाकच्या या सूत्रावर २-३ देश वगळता कुणीही भीक घालत नाही !

बारामुला (जम्मू-काश्मीर) येथे २ आतंकवादी ठार

अनंतनागमदील कोकेरनाग येथे चौथ्या दिवशीही चकमक चालू आहे. येथे एका आतंकवाद्याला ठार मारण्यात आले आहे, तर दुसर्‍याचा शोध घेण्यात येत आहे. याच वेळी काश्मीरच्या बारामुला येथे सुरक्षादलांनी २ आतंकवाद्यांना ठार केले.

यंदा प्रथमच जम्मू-काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होणार !

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपति ट्रस्ट’सह पुण्यातील ५ मानाच्या गणपति मंडळांसह अखिल मंडई मंडळाचे विश्‍वस्त एकत्र येत यंदा काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) येथे एकूण ५ अधिकारी आणि सैनिक वीरगतीला प्राप्त

काश्मीरमध्ये प्रतिवर्षी १०० हून अधिक आतंकवाद्यांना ठार केले जाते, तरीही तेथील आतंकवाद समूळ नष्ट झालेला नाही. त्यासाठी आतंकवाद्यांचा निर्माता असणार्‍या पाकला नष्ट करणे आवश्यक आहे !

राजौरी (जम्मू-काश्मीर) येथे आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैन्याच्या श्‍वानाला वीरमरण !

आतापर्यंत या चकमकीत २ आतंकवादी ठार झाले आहेत, तर सुरक्षादलाचे २ अधिकारी घायाळ झाले आहेत.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतविरोधी कारवाया करणार्‍या कुख्यात आतंकवाद्याची हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षादलाच्या विरोधातील अनेक आक्रमणात अबू कासिम याचा सहभाग होता. तो पाकव्याप्त काश्मीरमधील लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांना जम्मू-काश्मीरमध्ये घुसवण्याचे काम करत होता.

काश्मीरमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक

पोलिसांनी गेल्या २४ घंट्यांत एकाच वेळी ४ वेगवेगळ्या ठिकाणी आतंकवादविरोधी कारवाया करून या ५ जणांना अटक केली. त्यांच्याकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला.

जम्मू-काश्मीरमधील पाक सीमेवरून भारतीय सैनिक बेपत्ता

सुरक्षा दलाकडून बेपत्ता सैनिक अमित पासवान याचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू आहे; मात्र अद्याप यश आलेले नाही.