बारामुला (जम्मू-काश्मीर) येथे २ आतंकवादी ठार

बारामुला (जम्मू-काश्मीर) – अनंतनागमदील कोकेरनाग येथे चौथ्या दिवशीही चकमक चालू आहे. येथे एका आतंकवाद्याला ठार मारण्यात आले आहे, तर दुसर्‍याचा शोध घेण्यात येत आहे. याच वेळी काश्मीरच्या बारामुला येथे सुरक्षादलांनी २ आतंकवाद्यांना ठार केले. तत्पूर्वी आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या दोघा जणांना शस्त्रसाठ्यासह अटक करण्यात आली आहे.