पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर अल हक काकड यांची गरळओक !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान काश्मीरचे सूत्र जगाच्या प्रत्येक मंचावर उपस्थित करत राहील; कारण हे संयुक्त राष्ट्रांच्या पटलावरील सर्वांत जुने आणि आतापर्यंत न सुटलेले सूत्र आहे, असे विधान पाकचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकड यांनी ‘व्हाइस ऑफ अमेरिका’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेमध्ये सहभागी होण्यासाठी जाण्यापूर्वी ते ही मुलाखत देत होते. पंतप्रधान काकड यांनी आरोप केला की, भारताने काश्मीरला जगाचा सर्वांत मोठे कारागृह बनवले आहे. काश्मिरी लोकांचा आवाज दाबला जात आहे. (काश्मीरमध्ये काय स्थिती आहे, हे जगाला ठाऊक आहे. पाकने कितीही खोटे आरोप करण्याचा प्रयत्न केला, तरी त्याचा काहीही लाभ होणार नाही ! – संपादक)
तालिबानी आतंकवाद्यांकडून पाक-अफगाणिस्तान सीमेवर आक्रमण केली जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर देशातील निवडणुकांविषयी पंतप्रधान काकड म्हणाले की, अफगाणिस्तानच्या सीमेवर तणाव असला, तरी सार्वत्रिक निवडणुकीला उशीर होणार नाही.
संपादकीय भूमिका
|