पुणे – जम्मू काश्मीरमधील ‘गणपतीयार ट्रस्ट’मध्ये गणेशोत्सव साजरा व्हावा, याकरता पुण्यातील ७ मंडळे एकत्र येऊन ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट’चे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या पुढाकाराने मूर्ती प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. काश्मीरमध्ये यंदा प्रथमच दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा होणार आहे. ‘पुण्यातील गणेशोत्सव मंडळांच्या पुढाकाराने कश्मीरमध्ये पहिल्यांदाच आम्ही गणेशोत्सव साजरा करत आहोत. याचा आम्हाला आनंद होत आहे’, असे काश्मीरमधील ‘गणपतीयार ट्रस्ट’चे संदीप कौल यांनी सांगितले.
Ganeshotsav In Kashmir : पुतीन बालन यांच्या पुढाकाराने काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजराhttps://t.co/8yg0sJvAZl#pune #kashimir #ganeshutsav #GaneshotsavInKashmir
— Lokshahi Marathi (@LokshahiMarathi) September 14, 2023
‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपति ट्रस्ट’सह पुण्यातील ५ मानाच्या गणपति मंडळांसह अखिल मंडई मंडळाचे विश्वस्त एकत्र येत यंदा काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार श्रीनगर येथील ‘गणपतीयार टेम्पल’चे संदीप कौल आणि शिशांत चाको यांच्याकडे पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपति सार्वजनिक मंडळाच्या बाप्पाची प्रतिकृती सुपुर्द करण्यात आली. हा कार्यक्रम श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपति ट्रस्ट येथे उत्साहात पार पडला.
कश्मीरमध्ये होणार बाप्पाचा जयजयकार#गणशोत्सव #गणपतीबाप्पामोरया #Pune #Maharashtra #kashmir pic.twitter.com/MH6qi9fIUg
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 14, 2023
या वेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे विश्वस्त, उत्सव प्रमुख पुनीत बालन, ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, कसबा गणपति मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.