काश्मीरमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – काश्मीरमध्ये पोलिसांनी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित ३ आतंकवाद्यांसह एकूण ५ आतंकवाद्यांना अटक केली आहे. पोलिसांनी गेल्या २४ घंट्यांत एकाच वेळी ४ वेगवेगळ्या ठिकाणी आतंकवादविरोधी कारवाया करून या ५ जणांना अटक केली. त्यांच्याकडून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला.