कुख्यात गुंड छोटा राजन याच्या मृत्यूची अफवा

येथील तिहार कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड छोटा राजन याचा कोरोनामुळे एम्स रुग्णालयात उपचार चालू असतांना मृत्यू झाला अशी अफवा ७ मे या दिवशी पसरली होती…..

विरारमधील कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत १४ रुग्णांचा मृत्यू

वारंवार घडणार्‍या अशा घटना शासकीय यंत्रणांना लज्जास्पद ! गेल्या काही मासांत घडलेल्या अशा घटनांतून काहीही न शिकणार्‍या अन् रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या प्रशासनातील उत्तरदायींना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे….

आरोपी श्रीमंत आहे; म्हणून त्याला सवलत देता येऊ शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालय

तुम्ही श्रीमंत आहात म्हणून तुम्हाला सवलत हवी आहे; परंतु आम्ही हे करणार नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने एका अपघाताच्या खटल्याच्या प्रकरणात आरोपीला सुनावले.

बेंगळुरू येथे वेश्या व्यवसाय अड्ड्यावर धाड टाकून तिघा धर्मांधांंना अटक

नौशाद अली, रियाजुल शेख आणि समीर अशी त्यांची नावे आहेत. या तिघांनी वेगळ्या नावावर आधारकार्ड बनवून महिलांना फसवून वेश्या व्यवसाय चालवल्याचे पोलिसांनी सांगितले.

बिकानेर (राजस्थान) येथील कारागृहातून ५ बंदीवानांचे पलायन

काँग्रेसच्या राज्यातील कारागृहातून बंदीवान पळून जात असतील, तर बाहेर कारवाया करणार्‍या गुंडांना पोलीस कधीतरी पकडू शकतात का ?

कल्याण येथील आधारवाडी कारागृहातील ३० बंदीवान कोरोनाबाधित !

कारागृहात सध्या १ सहस्र ९२२ बंदीवान आहेत. कोरोनाबाधितांची प्रकृती ठीक असून त्यांच्यावर ठाणे येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत.

महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक बंदीवान !

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत एकीकडे संक्रमित रुग्ण वाढत आहेत, तर दुसरीकडे राज्यातील एकूण कारागृहामध्ये कोरोनाबाधित बंदीवानांच्या संख्येतही वाढ होत आहे. राज्यातील सर्व कारागृहांत २३ सहस्र २१७ बंदीवानांची क्षमता असतांना तेथे ३४ सहस्र ३२० बंदीवानांना ठेवण्यात आले आहे.

पुरावे नष्ट केल्याच्या कारणावरून निलंबित पोलीस अधिकारी रियाझ काझी यांना अटक !

पुरावे नष्ट करण्यासाठी काझी यांनी सचिन वाझे यांना साहाय्यक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यांना १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे आणि नीलेश घायवळ या दोघांवर एम्.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई !

सामान्य जनतेस गुन्हेगारी टोळ्यांपासून त्रास असल्यास त्यांनी निर्भीडपणे पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याची नाशिकच्या कारागृहात ठेवण्याची मागणी

पत्रकारिता करतांना ज्यांचे घोटाळे बाहेर काढले, ज्यांच्या विरोधात बातम्या दिल्या, त्यातील काही आरोपी नगर आणि येरवडा कारागृहात आहेत. मलाही त्याच ठिकाणी ठेवले, तर माझ्या जिवाला धोका होऊ शकतो…..